Jay Shah: जय शाह आयसीसीचे अध्यक्ष होणार?; निवडणूक जिंकल्यास नवीन विक्रम नोंदवणार, लवकरच महत्वाची बैठक
ICC Election Jay Shah: जय शाह आयसीसीच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे.
ICC Election Jay Shah: जय शाह (Jay Shah) 2019 पासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव आहेत. याचदरम्यान जय शाह आयसीसीच्या (ICC) अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे. जय शहा यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज केला आणि निवडणूक जिंकल्यास ते आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष बनतील.
जय शाह यांनी आयसीसी अध्यक्षपदासाठी अर्ज केल्यास त्यांची नवीन अध्यक्षपदी बिनविरोध निवड होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र जय शाह यांनी याबाबत अजून कोणतेही अधिकृत माहिती दिलेली नाही. नोव्हेंबर 2024 मध्ये आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. सध्या, न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत.
If Jay Shah becomes the new ICC Chairman, he'll serve a 3 year term there and in 2028 he'll be eligible to become the BCCI President. (Cricbuzz). pic.twitter.com/ZDqecnZTDJ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 8, 2024
आयसीसीची जुलै महिन्यात बैठक-
क्रिकबझच्या माहितीनूसार, ICC जुलै महिन्यात कोलंबोमध्ये एक बैठक घेणार आहे, ज्यामध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली जाऊ शकते. जय शाह यांनी अद्याप या विषयावर आपले मौन तोडले नसले तरी आयसीसीच्या काही पद्धतींवर ते समाधानी नसल्याचे वृत्त आहे. वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये टी-20 विश्वचषक 2024 आयोजित करण्याबद्दल शाह देखील समाधानी नव्हते.
आयसीसी अध्यक्षांच्या कार्यकाळात बदल-
आयसीसी अध्यक्षांच्या कार्यकाळात बदल करण्यात आला आहे. यापूर्वी एखादी व्यक्ती तीन वेळा अध्यक्ष होऊ शकत होती आणि प्रत्येक कार्यकाळ 2 वर्षांसाठी होता. परंतु नवीन नियमांनुसार, एखादी व्यक्ती दोनदा अध्यक्ष होऊ शकते आणि प्रत्येक कार्यकाळ 3 वर्षांचा असेल. जय शाह आयसीसीचे अध्यक्ष झाल्यास ते या पदावर 3 वर्षे राहतील.
2009 मध्ये गुजरात क्रिकेट असोसिएशनमधून एन्ट्री-
जय शाहने 2009 मध्ये क्रिकेट प्रशासनात एन्ट्री घेतली होती. त्याआधी ते गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव पद सांभाळत होते. त्यानंतर 2015 साली जय शाह बीसीसीआयमध्ये सहभागी झाले आणि सप्टेंबर 2019 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव झाले.
संबंधित बातम्या:
'टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी अन् WTC जिंकणार; जय शाह यांचं मोठं विधान