एक्स्प्लोर

Ind vs Zim T20: 'अहंकाराला पायबंद बसला...'; टीम इंडियाचा झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर शशी थरुर यांचं ट्विट

Ind vs Zim T20: टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर भारतीय संघ हरारे स्पोर्टर्स क्लबमध्ये पहिली मॅच खेळत होता.

Ind vs Zim T20: टी-20 विश्वविजेत्या भारतीय संघाला झिम्बाब्वेने 13 धावांनी पराभूत केले. या विजयासह झिम्बाब्वेने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजी करताना झिम्बाब्वेने भारतापुढे 116 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मात्र भारतीय संघ 102 धावांवर सर्वबाद झाला. 

टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर भारतीय संघ हरारे स्पोर्टर्स क्लबमध्ये पहिली मॅच खेळत होता. मुझरबनी आणि चटारानं शेवटच्या दोन ओव्हरमध्ये केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताला 13 धावांनी पराभूत केलं. वॉशिंग्टनं सुंदरनं 27 धावांची खेळी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला. झिम्बॉब्वे विरुद्ध शुभमन गिल आणि वॉशिंग्टनं सुंदर शिवाय इतर फलंदाज चांगली खेळी करण्यात अपयश आलं.

भारतीय संघाच्या या पराभवानंतर काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी 'एक्स'द्वारे बीसीसीआयवर निशाणा साधला आहे.  नुकताच मुंबईत विश्वविजेत्या भारतीय संघाच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. तो आवाज अद्याप कमी झालेला नसताना हरारे येथे आपल्याला झिम्बाब्वेसारख्या नवख्या संघाकडून पराभव पत्करावा लागला. यावरून एक स्पष्ट होते की, बीसीसीआय फक्त गोष्टी गृहीत धरण्यासाठी पात्र आहे. चार जून असो वा सहा जुलै. अहंकाराला पायबंद बसला आहे. झिम्बाब्वेचा संघ चांगला खेळला, असं शशी थरुर म्हणाले.

सामना कसा राहिला?

झिम्बाब्वेने भारतापुढे 116 धावांच लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक शर्माच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला. अभिषेक शर्माला खातंही उघडता आलं नाही, तो शून्यावर बाद झाला. यानंतर तिसऱ्या क्रमाकांवर फलंदाजीसाठी आलेल्या ऋतुराज गायकवाड देखील झटपट बाद झाला. ऋतुराज गायकवाडने 7 धावा केल्या. भारतीय संघाकडून पदार्पण करणाऱ्या रियान परागलाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. रियान परागने फक्त 2 धावा केल्या. रिंकु सिंह देखील शून्यावर बाद झाला. कर्णधार शुभमन गिल आणि ध्रुव जुरेलने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनाही अपयश आले. शुभमन गिल 31 धावा करत बाद झाला, तर ध्रुव जुरेलने 6 धावा केल्या. झिम्बाब्वेकडून कर्णधार सिंकदर राजाने 3 विकेट् घेतल्या. 

झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारताचा संघ:

शुभमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रियान पराग, रिंकु सिंह, वॉशिंग्टन सुंदर, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद, रवी बिश्नोई, साई सुदर्शन, जितेश शर्मा, तुषार देशपांडे, हर्षित राणा

India vs Zimbabwe चे वेळापत्रक-

पहिली टी-20 - 6 जुलै, हरारे- झिम्बाब्वेचा विजय
दुसरी टी-20 - 7 जुलै, हरारे
तिसरी टी-20 - 10 जुलै, हरारे
चौथी टी-20 - 13 जुलै, हरारे
पाचवी टी-20- 14 जुलै, हरारे

संबंधित बातम्या:

Team India Celebration: झाडावर चढलेल्या चाहत्याला पाहून रोहित शर्मा अन् विराट कोहलीने काय केलं?; व्हिडीओची तुफान चर्चा

घरी गेल्यानंतर हार्दिक पांड्याने मेडल कोणाला दिले?; अखेर फोटो आला समोर, सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस

1983, 2007, 2011 साली विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाला BCCI कडून किती रुपये मिळाले?, पाहा A टू Z माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : भुजबळ, झिरवाळ, भुसेंसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, नाशिकमध्ये मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार?
भुजबळ, झिरवाळ, भुसेंसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, नाशिकमध्ये मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार?
Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Polling Booth : पार्ल्यातील मतदानकेंद्रावर लांबच लांब रांगAjit Pawar Baramati : मला ही निवडणूक विकासाच्या मार्गावर न्यायची - अजित पवारSandip Deshpande Worli : लोकांनी ठरवलंय; आपल्याला उपलब्ध असलेल्या माणसाला मत द्यायचंMohan Bhagwat Nagpur :  मतदान करणं हे नागरिकांचं कर्तव्य - मोहन भागवत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : भुजबळ, झिरवाळ, भुसेंसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, नाशिकमध्ये मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार?
भुजबळ, झिरवाळ, भुसेंसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, नाशिकमध्ये मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार?
Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Embed widget