एक्स्प्लोर

Duleep Trophy : सरफराज खान टीम इंडियात येताच मोठा ट्विस्ट; 25 वर्षांच्या खेळाडूचं नशीब एका रात्रीत पालटलं, संघात झाली निवड

Jay Gohil to replace Sarfaraz Khan in Duleep Trophy : श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे.

Jay Gohil to replace Sarfaraz Khan in Duleep Trophy : श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सरफराज खानला टीम इंडियात स्थान मिळाले आहे. दुखापतग्रस्त साई सुदर्शनच्या जागी सरफराजचा भारतीय संघात समावेश करण्यात आला. मात्र, सरफराजला टीम इंडियाकडून आलेल्या कॉलअपनंतर आता त्याच्या जागेवरही रिप्लेसमेंटची घोषणा करण्यात आली आहे. ही रिप्लेसमेंट दुलीप ट्रॉफीमध्ये वेस्ट झोनच्या संघात करण्यात आली आहे. सरफराज खानला भारतीय संघात स्थान मिळाल्यामुळे वेस्ट झोनच्या संघातील त्याची जागा रिकामी झाली होती. त्यामुळे त्याच्या जागी सौराष्ट्राचा फलंदाज जय गोहिल याला संघात स्थान देण्यात आले आहे.

25 वर्षीय जय गोहिलची चमकली किस्मत

वेस्ट झोनच्या संघात स्टँडबाय खेळाडू म्हणून असलेल्या जय गोहिलला आता सरफराज खानचा रिप्लेसमेंट म्हणून संधी मिळाली आहे. 25 वर्षीय गोहिलने मागील रणजी ट्रॉफी हंगामात सौराष्ट्रासाठी दमदार कामगिरी केली होती. 2025-26 रणजी ट्रॉफी हंगामात गोहिलने सौराष्ट्रासाठी 6 सामन्यांत 58.11च्या सरासरीने 523 धावा केल्या. यामध्ये त्याच्या नावावर एक शतक आणि चार अर्धशतकं आहेत. त्याची सातत्यपूर्ण कामगिरी पाहता दुलीप ट्रॉफीमध्ये त्याला आता मोठी संधी मिळाली आहे. जय गोहिलने आतापर्यंत 12 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 47.77च्या सरासरीने 860 धावा केल्या आहेत. त्यामुळे सरफराजच्या अनुपस्थितीत वेस्ट झोनसाठी गोहिलकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

वेस्ट झोनमध्ये सौराष्ट्राचे दोन खेळाडू

दुलीप ट्रॉफीसाठी वेस्ट झोनच्या संघात सौराष्ट्राचे जय गोहिल हे दुसरे खेळाडू आहेत. त्यांच्याशिवाय यष्टीरक्षक-फलंदाज हार्विक देसाई याचाही वेस्ट झोनच्या संघात समावेश आहे. भावनगरचा असलेल्या हार्विक देसाईने डिसेंबर 2022 मध्ये आसामविरुद्ध सौराष्ट्राकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 2022-23 हंगामात सौराष्ट्राने रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले, त्या विजयी मोहिमेचाही तो भाग होता.

साई सुदर्शनच्या दुखापतीमुळे सरफराजला संधी

दरम्यान, 15 ऑगस्टपासून गॉल येथे श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सरफराज खानला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. साई सुदर्शनच्या दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर व्हावे लागले. साई सुदर्शनला गेल्या महिन्यात इंडिया एच्या दौऱ्यादरम्यान पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. सध्या तो बंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये उपचार घेत असून पुनर्वसनाच्या प्रक्रियेत आहे.

दुलीप ट्रॉफीला 23 ऑगस्टपासून सुरुवात

महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली वेस्ट झोनचा संघ दुलीप ट्रॉफीच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. वेस्ट झोनचा पहिला सामना 23 ऑगस्ट रोजी बंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये नॉर्थ झोनविरुद्ध होणार आहे. 

हे ही वाचा -

Sourav Ganguly : आधी पत्र आलं... मग थेट जीवे मारण्याची धमकी! ‘ती’ पत्र मिळताच सौरव गांगुलीने थेट पोलीस स्टेशन गाठलं, धमकीमागे कोणाचा हात? खळबळजनक माहिती समोर

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Duleep Trophy : सरफराज खान टीम इंडियात येताच मोठा ट्विस्ट; 25 वर्षांच्या खेळाडूचं नशीब एका रात्रीत पालटलं, संघात झाली निवड
सरफराज खान टीम इंडियात येताच मोठा ट्विस्ट; 25 वर्षांच्या खेळाडूचं नशीब एका रात्रीत पालटलं, संघात झाली निवड
Sourav Ganguly : आधी पत्र आलं... मग थेट जीवे मारण्याची धमकी! ‘ती’ पत्र मिळताच सौरव गांगुलीने थेट पोलीस स्टेशन गाठलं, धमकीमागे कोणाचा हात? खळबळजनक माहिती समोर
आधी पत्र आलं... मग थेट जीवे मारण्याची धमकी! ‘ती’ पत्र मिळताच सौरव गांगुलीने थेट पोलीस स्टेशन गाठलं, धमकीमागे कोणाचा हात? खळबळजनक माहिती समोर
IND vs SL Playing XI : वॉर्म-अप मॅचमध्येच झाला गेम! कर्णधार गिल 3 नामांकित खेळाडूंना बेंचवरच सडवणार?, प्लेइंग-11 मधून OUT, एक तर डेब्यूची वाट बघतोय
वॉर्म-अप मॅचमध्येच झाला गेम! कर्णधार गिल 3 नामांकित खेळाडूंना बेंचवरच सडवणार?, प्लेइंग-11 मधून OUT, एक तर डेब्यूची वाट बघतोय
Bhuvneshwar Kumar 2027 World Cup : 2022 मध्ये खेळला शेवटचा वनडे सामना; आता भुवनेश्वर कुमार 2027 वर्ल्ड कप खेळणार?, म्हणाला, मला कॉल आला तर...
2022 मध्ये खेळला शेवटचा वनडे सामना; आता भुवनेश्वर कुमार 2027 वर्ल्ड कप खेळणार?, म्हणाला, मला कॉल आला तर...
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Embed widget