बुमराहची पॉवरप्लेमध्ये पॉवर... प्रत्येक संघाला भरतेय धडकी, यॉर्कर किंगची आकडेवारी पाहून घामटा फुटेल!
Jasprit Bumrah In Powerplay Overs: बुमराह फक्त आजच्याच सामन्यात नव्हे तर याआधीच्या चार सामन्यातही पॉवरप्लेमध्ये भेदक मारा केलाय. बुमराहची गोलंदाजी पाहून प्रतिस्पर्धी संघाला घामटा फुटला असेल.
Jasprit Bumrah In Powerplay Overs: धरमशालामध्ये भारत आणि न्यूझीलंड या टेबल टॉपर संघामध्ये सामना सुरु आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी भेदक मारा करत प्रतिस्पर्धी फलंदाजांना बांधून ठेवले. विशेषकरुन बुमराहच्या माऱ्यापुढे न्यूझीलंडचे गोलंदाजांना धावा काढता येत नव्हत्या. बुमराहने 4 षटकात फक्त 11 धावा खर्च केल्या. यामध्ये एक षटकही निर्धाव टाकले. बुमराह फक्त आजच्याच सामन्यात नव्हे तर याआधीच्या चार सामन्यातही पॉवरप्लेमध्ये भेदक मारा केलाय. बुमराहची गोलंदाजी पाहून प्रतिस्पर्धी संघाला घामटा फुटला असेल.
बुमराहची भेदक गोलंदाजी -
यंदाच्या विश्वचषकात पॉवरप्लेमध्ये बुमराहने भेदक मारा केला आहे. जसप्रीत बुमराह विरोधी संघाच्या फलंदाजांसाठी कोडे असल्याचे दिसतेय. न्यूझीलंडविरोधात बुमराहने पॉवरप्लेमध्ये चार षटके गोलंदाजी केली, यामध्ये त्याने फक्त 11 धावा खर्च केल्या. त्याआधी बांगलादेशविरोधात 4 षटकात 13 धावा दिल्या होत्या. पाकिस्तानविरोधात 4 षटकात 14 धावा खर्च केल्या होत्या. अफगानिस्तानविरोधात 4 षटकात फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. एका अफगाण फलंदाजालाही तंबूत पाठवले होते. तर ऑस्ट्रेलियाविरोधात 4 षटकात 11 धावा खर्च करत एक विकेटही घेतली होती.
Jasprit Bumrah in Powerplay in World Cup 2023:
— Johns. (@CricCrazyJohns) October 22, 2023
4-0-11-1 vs Australia.
4-0-9-1 vs Afghanistan.
4-1-14-0 vs Pakistan.
4-1-13-0 vs Bangladesh.
4-1-11-0 vs New Zealand.
Bumrah is the complete package of this generation. pic.twitter.com/8PL0shAFlf
जसप्रीत बुमराहने यंदाच्या विश्वचषकात अचूक टप्प्यावर मारा केला आहे. बुमराहच्या भेदक माऱ्यापुढेही दिग्गद फलंदाजही फेल गेल्याचे दिसतेय. सुरुवातीला बुमराहचा सामना करणं, प्रतिस्पर्धी फलंदाजांसाठी मोठी कसोटीच होय. बुमराहने आतापर्यंत 4 सामन्यात 14.50 च्या सरासरीने 10 फलंदाजांना बाद केले आहे. आता न्यूझीलंडविरोधात बुमराह कशी कामगिरी करतोय, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. बुमराहने न्यूझीलंडविरोधात आतापर्यंत 4 षटके गोलंदाजी केली असून यामध्ये फक्त 11 धावा खर्च केल्या.
न्यूझीलंडची चांगली सुरुवात -
रचित रविंद्र आणि डॅरेल मिचेल यांनी 100 धावांची भागीदारी करत न्यूझीलंडचा डाव सावरला. 109 धावांवर न्यूझीलंडचे दोन फलंदाज तंबूत परतले होते. डेवेन कॉनवेला सिरजने शून्यावर बाद केले होते. तर विल यंग याला शामीने 17 धावांवर बाद केले. 25 षटकानंतर न्यूझीलंडने दोन बाद 126 धावा केल्या आहेत. रचित रविंद्र आणि डॅरेल मिचेल यांनी अर्धशतके केली आहेत.
विश्वचषकात भन्नाट रेकॉर्ड, तरीही शामी संघाबाहेर, संधी मिळताच पहिल्याच चेंडूवर क्लिन बोल्ड