T20 World Cup 2022: जगातील पाच आक्रमक खेळाडू टी-20 विश्वचषकातून बाहेर; भारतासह 'या' देशांचंही नुकसान
T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळली जाणार आहे. मात्र, या स्पर्धेत जगातील 5 सर्वोत्तम खेळाडू सहभागी होणार नाहीत.
T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळली जाणार आहे. मात्र, या स्पर्धेत जगातील 5 सर्वोत्तम खेळाडू सहभागी होणार नाहीत. भारताचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) दुखापतीमुळं टी-20 विश्वचषकातून बाहेर पडलाय. तर, भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पाठीच्या दुखापतीनं त्रस्त असून आगामी विश्वचषकात त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. याशिवाय, इंग्लंडचा आक्रमक गोलदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) आणि तडाखेबाज फलंदाज जॉनी बेअरस्टोही (Jonny Bairstow) या स्पर्धेला मुकणार आहेत. याचबरोबर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीही (Shaheen Afridi) या स्पर्धेत खेळणार नसल्याचं सांगितलं जातंय.
भारताच्या अडचणीत वाढण्याची शक्यता
आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी भारताला जसप्रीत बुमराहच्या रुपात मोठा धक्का बसलाय. पीटीआयनं बीसीसीआयच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, पाठिच्या दुखापतीमुळं जसप्रीत बुमराह आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत खेळणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेत जसप्रीत बुमराहचं संघात पुनरागमन झालं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यानं दोन टी-20 सामनेही खेळले आहेत. परंतु, पाठीच्या दुखपतीच्या समस्यामुळं त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेला मुकावं लागलंय. तर, रवींद्र जाडेजा आधीच विश्वचषकातून बाहेर पडलाय. जाडेजानं भारतासाठी शेवटचा सामना ऑगस्ट 2022 मध्ये हाँगकाँगविरुद्ध खेळला होता. या दोन खेळाडूंची अनुपस्थिती भारतासाठी मोठी अडचण निर्माण करू शकते.
शाहीन आफ्रिदीच्या रुपात पाकिस्तानला मोठा धक्का
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीही दुखापतीमुळं संघाबाहेर आहे. शाहीननं जुलै 2022 मध्ये पाकिस्तानसाठी श्रीलंकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. शाहीनच्या अनुउपस्थिती पाकिस्तानचं टेन्शन वाढवू शकतं. मात्र, संघानं पर्याय तयार ठेवले आहेत.
जॉनी बेअरस्टो, जोफ्रा आर्चरची कमतरता जाणवण्याची शक्यता
इंग्लंडबद्दल बोलायचे झाले तर संघाचं दिग्गज खेळाडू जॉनी बेअरस्टो आणि जोफ्रा आर्चर संघाबाहेर आहेत. यावेळी हे दोघेही टी-20 विश्वचषकात खेळणार नाहीत. इंग्लंडमध्ये पार पडलेल्या 2019 च्या टी-20 विश्वचषकात जॉनी बेअरेस्टो आणि जोफ्रा आर्चरनं महत्वाची भूमिका बजावली होती. ज्यामुळं इंग्लंडचा संघ विश्वचषक जिंकला.
हे देखील वाचा-