Hardik Pandya : ब्रिटीश गायिका जॅस्मिन वालियाच्या प्रेमात पडला हार्दिक पांड्या? इटलीच्या स्विमिंग पूलमधील ते फोटो आले समोर
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा अशा खेळाडूंपैकी एक आहे जो सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत राहतो.
Jasmin Walia dating Hardik Pandya : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा अशा खेळाडूंपैकी एक आहे जो सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत राहतो. टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यात शानदार गोलंदाजीनंतर तो चाहत्यांच्या नजरेत हिरो बनला. त्यानंतर त्याने नुकतीच पत्नी नताशा स्टॅनकोविचपासून घटस्फोटाची घोषणा केली.
दरम्यान, हार्दिक पांड्या सध्या ग्रीसमध्ये आहे, ज्याचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले. ही फोटो समोर आल्यानंतर पांड्याचे नाव ब्रिटीश गायिका जस्मिन वालिया हिच्याशी जोडले जात आहे. हार्दिक आणि जस्मिन एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे.
खरंतर, हार्दिक आणि जस्मिनने अलीकडेच इटलीतील काही फोटो शेअर केले आहेत जे एकाच ठिकाणचे वाटत आहे. दोन्ही फोटोच्या मागे एकच स्विमिंग पूल आहे. जस्मिनने या पूलमधील तिचे ब्लू बिकिनीमधील फोटो शेअर केले आहेत. हार्दिकने त्याच पूलजवळ फिरतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हार्दिक आणि जास्मिन अद्याप एकमेकांसोबत दिसले नसले तरी सोशल मीडियावर चाहते दोघेही गुपचूप डेट करत असल्याचे सांगत आहेत.
कोण आहे ती जस्मिन वालिया?
जस्मिन वालिया ही एक ब्रिटिश गायिका आहे. ती ब्रिटिश रिॲलिटी टीव्ही मालिका 'द ओन्ली वे इज एसेक्स'चा भाग होती. 2014 मध्ये, तिने तिचे YouTube चॅनल सुरू केले जेथे ती इतरांची गाणी गाऊन आपली प्रतिभा दाखवत होती. 2017 मध्ये जास्मिनला 'बॉम डिग्गी' गाण्याने तिचा सर्वात मोठा ब्रेक मिळाला.
View this post on Instagram
'सोनू के टीटू की स्वीटी' या गाण्याने मिळाली ओळख
हे गाणे 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या बॉलीवूड चित्रपट 'सोनू के टीटू की स्वीटी' साठी रिमेक करण्यात आले होते. याशिवाय जस्मिनचा म्युझिक व्हिडिओ 'नाइट्स अँड फाईट्स' देखील 2022 मध्ये रिलीज झाला होता. ज्यामध्ये ती 'बिग बॉस 13' च्या फायनलिस्ट असीम रियाझसोबत दिसली होती.
हार्दिक-नताशाचे नाते 4 वर्षे
पांड्या आणि नताशाचे 2020 मध्ये लग्न झाले होते. 2021 मध्ये त्यांचा मुलगा अगस्त्यचा जन्म झाला. पण 18 जुलै रोजी दोघांनीही एक निवेदन जारी करून वेगळे झाल्याची घोषणा केली. दोघांनीही 4 वर्षांचे वैवाहिक जीवन संपवले.