IPL 2026 Remaining Purse: केकेआरकडे 64 कोटी, तर मुंबईकडे 3 कोटी रुपयेही नाही; कोणाकडे किती रुपये शिल्लक?, 10 संघांची A टू Z माहिती
IPL 2026 Remaining Purse: आयपीएल 2026 च्या हंगामाआधी 15 डिसेंबरमध्ये एक मिनी लिलाव होणार आहे. आयपीएलचा हा लिलाव यूएईमध्ये होणार आहे.

IPL 2026 Remaining Purse: डिसेंबरमध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या 19 व्या आवृत्तीच्या लिलावापूर्वी (IPL 2026) आज आयपीएलमधील सर्व संघांची अधिकृत रिटेन्शन यादी जाहीर (Retention List IPL 2026) करण्यात आली. त्यामुळे कोणत्या संघाने कोणते खेळाडू रिलीज केले आहेत आणि कोणते रिटेन केले आहे, हे स्पष्ट झाले आहे. आयपीएल 2026 च्या हंगामाआधी 15 डिसेंबरमध्ये एक मिनी लिलाव होणार आहे. (IPL 2026 Auction) आयपीएलचा हा लिलाव यूएईमध्ये होणार आहे. दरम्यान, आयपीएल 2026 च्या लिलावात कोणत्या संघाकडे किती रुपये शिल्लक आहेत, याची माहितीही समोर आली आहे.
केकेआरकडे 64 कोटी रुपये शिल्लक- (IPL KKR MI CSK RCB)
आयपीएल रिटेन्शननंतर कोलकाता नाईट रायडर्सकडे सर्वाधिक पैसे आहेत. केकेआरच्या पर्समध्ये 64.3 कोटी रुपये आहेत. केकेआरने लिलावापूर्वी आंद्रे रसेल आणि वेंकटेश अय्यर महागड्या खेळाडूंना रिलीज केले आहे. तर मुंबई इंडियन्सकडे सर्वात कमी पैसे शिल्लक आहे. मुंबईने एकूण 17 खेळाडू रिटेन केले आहेत आणि 3 खरेदी-विक्रीद्वारे मिळवले आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स (KKR पर्स बॅलन्स 2026)
उर्वरित स्लॉट्स - 13
पर्स बॅलन्स - 64.3 कोटी रुपये
चेन्नई सुपर किंग्ज (CSK पर्स बॅलन्स 2026)
उर्वरित स्लॉट्स - 9
पर्स बॅलन्स - 43.4 कोटी रुपये
सनरायझर्स हैदराबाद (SRH पर्स बॅलन्स 2026)
उर्वरित स्लॉट्स - 10
पर्स बॅलन्स - 25.5 कोटी रुपये
लखनऊ सुपर जायंट्स (LSG पर्स बॅलन्स 2026)
उर्वरित स्लॉट्स - 6
पर्स बॅलन्स - 22.95 कोटी रुपये
दिल्ली कॅपिटल्स (DC पर्स बॅलन्स 2026)
उर्वरित स्लॉट्स - 8
पर्स बॅलन्स - 21.8 कोटी रुपये
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB पर्स बॅलन्स 2026)
उर्वरित स्लॉट्स - 5
पर्स बॅलन्स - 16.4 कोटी
राजस्थान रॉयल्स (RR पर्स बॅलन्स 2026)
उर्वरित स्लॉट्स - 9
पर्स बॅलन्स - 16.05 कोटी
गुजरात टायटन्स (GT पर्स बॅलन्स 2026)
उर्वरित स्लॉट्स - 6
पर्स बॅलन्स - 12.9 कोटी
पंजाब किंग्ज (PBKS पर्स बॅलन्स 2026)
उर्वरित स्लॉट्स - 4
पर्स बॅलन्स - 11.5 कोटी
मुंबई इंडियन्स (MI पर्स बॅलन्स 2026)
उर्वरित स्लॉट्स - 5
पर्स बॅलन्स - 2.75 कोटी
🚨 NEWS 🚨
— IndianPremierLeague (@IPL) November 15, 2025
The player retention window for #TATAIPL 2026 season closed on November 15, 2025, with all 10 franchises confirming their retained players ahead of the auction.
The #TATAIPLAuction will take place on 16th December at the Etihad Arena in Abu Dhabi.
More details 🔽…





















