KKR Retention List IPL 2026: आंद्रे रसेल, मोईन अलीसह 9 जणांना दाखवला बाहेरचा रस्ता; केकेआरने कोणाला संघात कायम ठेवले?, संपूर्ण यादी!
KKR Retention List IPL 2026: आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने रिंकू सिंग, सुनील नारायण आणि अजिंक्य रहाणेसह 12 खेळाडूंना रिटेन केले आहे.

KKR Retention List IPL 2026: आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी (IPL 2025) कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) रिंकू सिंग, सुनील नारायण आणि अजिंक्य रहाणेसह 12 खेळाडूंना रिटेन केले आहे. केकेआरच्या रिटेन्शन यादीमधील सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे आंद्रे रसेललाही रिलीज (KKR Retention List IPL 2026) केले आहे. आंद्र रसेल 2014 पासून केकेआर संघासाठी खेळत आहे. केकेआरने एकूण 9 खेळाडूंना रिलीज केले आहे.
केकेआरने संघात ठेवलेल्या खेळाडूंची यादी- (KKR Retention List IPL 2026)
- रिंकू सिंग
- अंग्रेश रघुवंशी
- अजिंक्य रहाणे
- मनीष पांडे
- रोवमन पॉवेल
- सुनील नारायण
- रमनदीप सिंग
- अनुकुल रॉय
- वरुण चक्रवर्ती
- हर्षित राणा
- वैभव अरोरा
- उमरन मलिक
From Eden to the world: Your 𝐫𝐞𝐭𝐚𝐢𝐧𝐞𝐝 Knights for 2026 😍💜 pic.twitter.com/xL4ClNltUF
— KolkataKnightRiders (@KKRiders) November 15, 2025
केकेआरने संघातून काढलेल्या खेळाडूंची यादी- (KKR Released List IPL 2026)
- लवनीत सिसोदिया
- क्विंटन डी कॉक
- रहमानउल्ला गुरबाज
- वेंकटेश अय्यर
- आंद्रे रसेल
- मोईन अली
- स्पेंसर जॉन्सन
- अँरिक नोरखिया
- चेतन सकारिया
आयपीएल 2026 च्या लिलावात केकेआरकडे किती पैसे? (KKR IPL 2026)
कोलकाता नाईट रायडर्सने वेंकटेश अय्यरसह त्यांच्या अनेक महागड्या खेळाडूंना सोडले आहे. वेंकटेशला गेल्या लिलावात केकेआरने 23.75 कोटींना खरेदी केले. तर 12 कोटी रुपयांना संघात घेतलेल्या आंद्रे रसेललाही केकेआरने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडे आयपीएल 2026 च्या लिलावात 64.3 कोटी शिल्लक आहेत. 13 खेळाडूंच्या जागा शिल्लक असल्याने, केकेआर लिलावात जास्तीत जास्त 13 खेळाडू खरेदी करू शकते. केकेआर 6 परदेशी खेळाडू देखील खरेदी करू शकतो.
आयपीएल 2026 चा लिलाव कधी होणार? (IPL 2026 Auction)
इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी आवृत्तीसाठी लिलाव डिसेंबरमध्ये होणार आहे. हा एक मिनी लिलाव असेल, जो कदाचित एक दिवस चालेल. आयपीएलचा लिलाव 15 डिसेंबर रोजी होण्याची अपेक्षा आहे. आयपीएलचा लिलाव यूएईमध्ये आयोजित केला जाऊ शकतो.





















