एक्स्प्लोर

IPL संपलं, आता टी20 विश्वचषकाचा महासंग्राम, पाहा टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक 

T20 World Cup 2024 : आयपीएल संपल्यानंतर आता क्रीडा चाहत्यांच्या नजरा टी20 विश्वचषकाकडे लागल्या आहेत.  दोन जून पासून टी20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.

T20 World Cup 2024 Indian Cricket Team Schedule : दोन महिन्यानंतर आयपीएलचा महासंग्राम संपलाय. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये रविवारी महाअंतिम सामना पार पडला. कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादचा दारुण पराभव करत चषकावर नाव कोरलेय. आयपीएल संपल्यानंतर आता क्रीडा चाहत्यांच्या नजरा टी20 विश्वचषकाकडे लागल्या आहेत.  दोन जून पासून टी20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. आठवडाभरात विश्वचषकाचा माहोल तयार होईल. भारतीय संघाची पहिली बॅच अमेरिकेत दाखल झाली आहे. उर्वरित खेळाडू चार दिवसांमध्ये रवाना होणार आहेत. 

यंदाचा टी20 विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. विश्वचषकात यंदा 20 संघ सहभागी होणार आहेत. दोन जूनपासून विश्वचषकाचा महासंग्राम सुरु होईल. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया ग्रुप अ मध्ये आहे. या ग्रुपमध्ये भारताशिवाय अमेरिका, कॅनडा, पाकिस्तान आणि आयर्लंड या संघांचा समावेश आहे.  भारतीय संघाचे साखळी फेरीतील सर्व सामने अमेरिकामध्येच होणार आहेत. 

भारतीय संघाचा विश्वचषकातील पहिला सामना 5 जून, बुधवारी आयर्लंडविरोधात होणार आहे. त्यानंतर 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. या सामन्याकडे क्रीडा विश्वाच्या नजरा लागल्या आहेत. हे दोन्ही सामने न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहेत. 

30 एप्रिल 2024 रोजी बीसीसीआयने टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या 15 सदस्यांची घोषणा केली होती. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करत आहे, तर हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपद सोपवम्यात आलेय. भारतीय संघात 15 प्रमुख खेळाडूंशिवाय चार राखीव खेळाडूंचीही निवड करण्यात आलेली आहे. 

टी20 विश्वचषकातील टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक

पहिला सामना 05 जून, बुधवार- भारत विरुद्ध आयरलँड- नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क

दूसरा सामना 09 जून, रविवार- भारत विरुद्ध पाकिस्तान- नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क

तिसरा सामना 12 जून बुधवार- भारत विरुद्ध अमेरिका, नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क

चौथा सामना 15 जून, शनिवार- भारत विरुद्ध कॅनाडा, सेंट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा. 

टी20 विश्वचषकासाठी टीम इंडिया 

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज. 

राखीव खेळाडू- शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान.

नामदेव कुंभार हे मागील नऊ ते दहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. क्रीडा, राजकारण, समाजकारण, शेती, चित्रपट, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये आवड आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
IND vs SL 1st Test Playing XI : सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
Ajinkya Rahane : निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा
निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget