एक्स्प्लोर

विराट-रोहित टी 20 मध्ये परतले, अय्यरसह कोणते खेळाडूवर संघाबाहेर जाणार?

T20 World Cup 2024 :  आगामी टी 20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेऊन टीम इंडियाची अफगाणिस्तानविरोधात (IND vs AFG T20I) निवड करण्यात आली आहे.

T20 World Cup 2024 :  आगामी टी 20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेऊन टीम इंडियाची अफगाणिस्तानविरोधात (IND vs AFG T20I) निवड करण्यात आली आहे. 16 सदस्य संघामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी कमबॅक केलेय. विराट आणि रोहित यांनी मागील वर्षभरापासून टी 20 क्रिकेटपासून फारकत घेतली होती होती. पण आता या दोन्ही दिग्गजांचं कमबॅक खूप काही सांगून जातेय. 

टी 20 क्रिकेटमध्ये रोहित आणि विराट खेळताना दिसणार नाहीत, असा अंदाज गेल्या काही दिवसांपासून बांधला जात होता. त्यामुळे टी 20 संघात या दोन्ही खेळाडूचं कमबॅक झाल्यामुळे चर्चा सुरु झाली आहे. यामागे अनेक कारणं, असल्याचं सांगितलं जातेय. रोहित शर्माच्या नेतृत्वावर, विराट कोहलीच्या स्ट्राइक रेटवर आणि युवा खेळाडूंना संधी मिळायला हवी, त्यामुळे विराट आणि रोहित फक्त कसोटी आणि वनडे पर्यंत मर्यादीत राहतील, अशा चर्चा होत्या. पण आता या चर्चा फेल ठरल्या आहेत. निवड समितीने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना टी 20 क्रिकेटमध्ये सामील करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

आगामी टी 20 विश्वचषकात रोहित शर्मा संघाची धूरा संभाळेल, असा कयास लावला जातोय. विराट कोहलीचेही संघातील स्थान निश्चित मानले जातेय. अशा स्थितीत या दोन दिग्गजांमुळे कोण कोणत्या खेळाडूंचं टी 20 वर्ल्डकपमधील स्थान धोक्यात आलोय... याचीही चर्चा सुरु झाली आहे. अफगाणिस्तानविरोधातील टी 20 मालिकेतून या प्रश्नाचं उत्तर मिळणं कठीण आहे. आयपीएल 2024 पर्यंत या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील. तरीही विराट आणि रोहित यांच्या कमबॅकमुळे टी 20 विश्वचषकात कुणाचा पत्ता कट होऊ शकतो.. याबाबत पाहूयात... 

श्रेयस अय्यर : 

श्रेयस अय्यर टीम इंडियासाठी वनडे आणि कसोटीतील महत्वाचा सदस्य आहे. पण टी 20 क्रिकेटमध्ये त्याला अद्याप प्रभाव पाडता आलेला नाही. रोहित आणि विराटच्या कमबॅकमुळे अय्यरचं संघातील स्थान धोक्यात आलेय. विराट कोहली तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला उतरणार, त्यामुळे अय्यरसाठी स्थान मिळणं कठीण आहे. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला असतील. अशा स्थितीत टी20 विश्वचषकात श्रेयस अय्यरला स्थान मिळण्याची शक्यता कमीच आहे. 

केएल राहुल :

वर्ल्ड कप 2023 मध्ये केएल राहुल याने फलंदाजीशिवाय विकेटकिपर म्हणूनही प्रभावी कामगिरी केली आहे. राहुलने मोक्याच्या क्षणी भारताला विजय मिळवून दिलाय. पण विश्वचषक 2023 फायनलमध्ये राहुलचू संथ फलंदाजी चर्चेत होती. टी 20 क्रिकेटमध्येही केएल राहुलने अनेकदा संथ फलंदाजी केली, त्याचा स्ट्राइक रेट नेहमीच चर्चेत राहिलाय. अशा स्थितीत यंदाच्या टी 20 विश्वचषकात केएल राहुल खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळेच अफगाणिस्तानविरोधात केएल राहुल याला संघाबाहेर ठेवलेय. आयपीएलमध्ये केएल राहुलने शानदार कामगिरी केली अन् अफगाणिस्तानविरोधात जितेश शर्मा आणि संजू फ्लॉप गेल्यास केएल राहुलला तिकिट मिळू शकते.  

ईशान किशन :

ईशान किशनही खराब स्ट्राइक रेटमुळे टी20 वर्ल्ड कपला मुकण्याची शक्यता आहे. ईशान किशन याला विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखलं जातं, पण गेल्या काही सामन्यात त्याला प्रभावी कामगिरी करता आली नाही. ईशान किशन याला आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करावी लागणार आहे, त्याशिवाय दुसरीकडे अफगाणिस्तानविरोधात संजू आणि जितेश फ्लॉप गेले, तर त्याचे टी 20 वर्ल्डकपसाठी दरवाजे उघडतील. 

यशस्वी-तिलक आणि रिंकू यांचं स्थान निश्चित ?

यशस्वी जायस्वाल, तिलक वर्मा आणि रिंकू सिंह गेल्या काही टी 20 सामन्यात शानदार कामगिरी केली आहे. अफगाणिस्तानविरोधातही त्यांना संधी मिळाली आहे. या तिन्ही खेळाडूंनी आपल्या कामगिरीत सातत्य ठेवल्यास टी 20 विश्वचषकातील त्यांचं स्थान निश्चित मानले जातेय. अशा स्थितीमध्ये केएल राहुल, ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यासारख्या दिग्गजांना टी 20 मध्ये प्रवेश मिळणं कटीण आहे. फलंदाजीमध्ये भारताकडे रोहित शर्मा, यशस्वी जायस्वाल, विराट कोहली, शुभमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह, हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा यासारखे पर्याय असतील. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 21 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Marathi Sahitya Sammelan : RSS मुळे माझा मराठीशी संबंध,पवारांसमोर UNCUT भाषणSharad Pawar Speech Marathi Sahitya Sammelan Delhi : आखिल भारतीय साहित्य संमेलनात शरद पवारांचे भाषणDr.Tara Bhawalkar speech Delhi:कोण पुरोगामी, कोण फुरोगामी, मोदी-पवारांसमोर तारा भवाळकरांनी सुनावलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
Vidarbha vs Kerala Final 2025 : रहाणे, सूर्या, शिवम दुबे सगळे स्टार फेल! रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मुंबईचा पराभव, फायनलमध्ये विदर्भ Vs केरळ मुकाबला
रहाणे, सूर्या, शिवम दुबे सगळे स्टार फेल! रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मुंबईचा पराभव, फायनलमध्ये विदर्भ Vs केरळ मुकाबला
Matric Student Shot Dead : इकडं जालन्यात दहावीचा मराठी पेपर फुटला अन् तिकडं काॅपी दाखवली नाही म्हणून एका विद्यार्थ्याने दोन विद्यार्थ्यांना रस्त्यावर गोळ्या घातल्या, एकाचा मृत्यू
इकडं जालन्यात दहावीचा मराठी पेपर फुटला अन् तिकडं काॅपी दाखवली नाही म्हणून एका विद्यार्थ्याने दोन विद्यार्थ्यांना रस्त्यावर गोळ्या घातल्या, एकाचा मृत्यू
Embed widget