BCCI Annual Contracts: भारतीय पुरुष आणि महिला खेळाडूंना मिळणाऱ्या वार्षिक पगारात किती फरक ?
भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीसीआयने महिला क्रिकेटरच्या वार्षिक कराराची घोषणा केली.
BCCI Annual Contracts for Senior Women : भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीसीआयने महिला क्रिकेटरच्या वार्षिक कराराची घोषणा केली. या करारात सतरा महिला खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंना वेगवेगळ्या ग्रेडमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक ग्रेडला वेगवेगळे मानधन आहे. महिनाभरापूर्वी पुरुष संघाच्या खेळाडूंसोबतच्या वार्षिक कराराची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये चार ग्रेडमध्ये २६ खेळाडूंचा समावेश करण्यात आलाय. महिला आणि पुरुष क्रिकेटर्सच्या ग्रेड्सच्या पगारात खू मोठा फरक आहे. महिला आणि पुरुष खेळाडूंच्या वार्षिक करारात १४ पटीचा फरक आहे. महिला खेळाडूंना कमी मानधन मिळत असल्याचे या करारातून दिसतेय.
टॉप ग्रेडमध्ये 6.50 कोटींचं अंतर -
'ग्रेड ए'मध्ये सामाविष्ट करण्यात आलेल्या महिला क्रिकेटर्सला बीसीसीआय वर्षाला 50 लाख रुपयांचे मानधन देते. तर 'ग्रेड ए+' पुरुष खेळाडूंना वर्षाला सात कोटींचा पगार दिला जातो. दोन्हीमध्ये तब्बल साडेसहा कोटींचा फरक आहे.
सेकंड ग्रेडमध्ये 16 पट पैशांचा फरक -
महिला क्रिकेटर्सच्या 'ग्रेड बी'मधील खेळाडूंना वर्षाला 30 लाख रुपयांचा पगार दिला जातो. तर पुरुषांना दुसऱ्या ग्रेडमध्ये वर्षाला पाच कोटी रुपये दिले जातात. दोन्ही करारात १६ पटीचा फरक आहे. महिला खेळाडूंपेक्षा पुरुष खेळाडूंना चार कोटी ७० लाख रुपये अधिक मानधन मिळते.
थर्ड ग्रेडमध्ये तीस पटीचा फरक -
महिला क्रिकेटर्सच्या 'ग्रेड सी'मध्ये खेळाडूंना वर्षाला दहा लाख रुपयांचे मानधन दिले जाते. तर तिकडे थर्ड ग्रेडमध्ये असणाऱ्या पुरुष खेळाडूंना वर्षाला तीन कोटी रुपयांचा पगार मिळतो. महिला आणि पुरुषांच्या करारात तीस पटींचा फरक आहे. पुरुष क्रिकेर्ट्समध्ये चौथा ग्रेडही असतो. या ग्रेडमध्ये असणाऱ्या खेळाडूंना वर्षाला एक कोटी रुपयांचे मानधन दिले जाते. महिला खेळाडूंना फक्त तीन ग्रेडमध्येच करारबद्ध केले जाते.
BCCI announces annual player retainership 2022-23 - Team India (Senior Women)
Grade |
S.No. |
Name |
A |
1 |
Ms. Harmanpreet Kaur |
2 |
Ms. Smriti Mandhana |
|
3 |
Ms. Deepti Sharma |
|
|
||
B |
1 |
Ms Renuka Thakur |
2 |
Ms. Jemimah Rodrigues |
|
3 |
Ms. Shafali Verma |
|
4 |
Ms. Richa Ghosh |
|
5 |
Ms. Rajeshwari Gayakwad |
|
|
||
C |
1 |
Ms. Meghna Singh |
2 |
Ms. Devika Vaidya |
|
3 |
Ms. Sabbineni Meghana |
|
4 |
Ms. Anjali Sarvani |
|
5 |
Ms. Pooja Vastrakar |
|
6 |
Ms. Sneh Rana |
|
7 |
Ms. Radha Yadav |
|
8 |
Ms. Harleen Deol |
|
9 |
Ms. Yastika Bhatia |