Virat Kohli : श्रीलंकेविरुद्ध सामन्यांपूर्वी विराट कोहलीचा मोठा निर्णय, आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून घेणार ब्रेक
IND vs SL : भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेपूर्वी एक मोठा निर्णय घेत आंतरराष्ट्रीय टी-20 मधून ब्रेक घेतल्याची माहिती समोर येत आहे.
Virat Kohli to take break from T20Is : भारत आणि श्रीलंका यांच्यातील (IND vs SL) टी-20 मालिकेला 3 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पण या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तात्पुरती विश्रांती घेत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे विराट आयपीएल 2023 पूर्वी भारतासाठी क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅट अर्थात टी20 मध्ये खेळताना दिसणार नाही.
विराटने टी-20 मधून घेतला ब्रेक
विराट कोहलीच्या ब्रेकबद्दल माहिती देताना, बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्ट्सला सांगितले की, “होय, विराटने कळवले आहे की तो टी20 सामन्यांसाठी उपलब्ध नाही. वनडे मालिकेतून तो संघात पुनरागमन करेल. मात्र, तो टी-20 इंटरनॅशनलमधून किती काळ ब्रेक घेत आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे, रोहित शर्माबद्दल बोलायचं झाले तर, आम्हाला त्याच्या पुनरागमनाची घाई करायची नाही. तो पूर्णपणे फिट आहे की नाही हे येत्या काळात ठरवले जाईल. त्याने फलंदाजीचा सराव सुरू केला आहे, पण आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही.''
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत विराट दिसणार नाही
विराट कोहलीने T20 आंतरराष्ट्रीय मधून ब्रेक घेण्याच्या निर्णयानंतर श्रीलंकेविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या T20 मालिकेत तो दिसणार नाही हे जवळपास नक्की झालं आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिका पुढील वर्षी 3 जानेवारीपासून सुरू होत आहे. याआधी सर्वांना वाटत होते की विराट या मालिकेत उपलब्ध होईल पण विराटने टी-20 मधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे.
भारत आणि श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक
श्रीलंकेचा संघ आपल्या भारत दौऱ्याची सुरुवात T20 मालिकेने करणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 3 जानेवारीला मुंबईत, दुसरा सामना 5 जानेवारीला पुण्यात तर तिसरा आणि अंतिम सामना 7 जानेवारीला राजकोटमध्ये खेळवला जाईल. त्याच वेळी, यानंतर, दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका देखील खेळली जाईल. ज्यांचा पहिला सामना 10 जानेवारीला गुवाहाटी, 12 जानेवारीला कोलकाता, तर तिसरा आणि अंतिम वनडे 15 जानेवारीला तिरुअनंतपुरममध्ये खेळवला जाईल.
हे देखील वाचा-