Watch Video: शिखर धवनने दाखवला 'गब्बर' अवतार, व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल!
Shikhar Dhawan News : टीम इंडियाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन अलीकडे सोशल मीडियावर तुफान अॅक्टिव्ह असतो, तो अनेक मजेशीर व्हिडीओ तयार करत असतो.
![Watch Video: शिखर धवनने दाखवला 'गब्बर' अवतार, व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल! Indian Cricketer Shikhar Dhawan Funny gabbar video with focus Indian went viral Watch video Watch Video: शिखर धवनने दाखवला 'गब्बर' अवतार, व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/13/3899db882cb6443754530b99f7597c71_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shikhar Dhawan Viral Video : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) आयपीएल 2022 (IPL 2022) नंतर सध्यातरी विश्रांतीवर असल्याचं दिसत आहे. धवनने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी केली, पण तरीही तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संघात नाही. याशिवाय तो अलीकडे मात्र सोशल मीडियावर तुफान अॅक्टिव्ह दिसत आहे. तो अनेक फनी व्हिडीओ तयार करत असतो. आताही त्याने एक मजेशीर व्हिडीओ तयार करत स्वत:च्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये धवन इन्स्टाग्रामवरील फनी व्हिडीओ तयार करणाऱ्या करन सोनावणेसोबत दिसत आहे. यामध्ये त्याला गब्बर न म्हटल्यास राग येतो आणि तो समोरच्याला चांगलच धुतो, अशा आशयाचा मजेशीर व्हिडीओ तयार केला आहे. शिखरला लाडाने गब्बर म्हटलं जातं, त्यालाही ही गोष्ट आवडत असल्याचंच या व्हिडीओतून समोर आलं आहे.
शिखर धवनची IPL 2022 मध्ये दमदार कामगिरी
पंजाब किंग्सचा सलामीवीर म्हणून खेळताना शिखर धवनने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात (IPL 2022)शानदार फॉर्मने धावा केल्या. त्याने 14 सामन्यात 122.66 च्या स्ट्राईक रेटने 460 धावा केल्या. यावेळी नाबाद 88 हा त्याचा सर्वोच्च स्कोर होता. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंना मिळणाऱ्या ऑरेंज कॅपच्या लढतीत तो टॉप 10 मध्ये होता. त्याने आतापर्यंत तीन अर्धशतकं देखील झळकावली.
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मालिकेत शिखरला संघात स्थान नाही
आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौरा करणार आहे. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताशी पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत अनेक युवा फलंदाजाला संधी देण्यात आली आहे. परंतु, या मालिकेतून शिखर धवनला वगळण्यात आलं आहे. इंग्लंड दौऱ्यातही शिखर धवनचं नाव नाही.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)