सानिया मिर्झासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर मोहम्मद शमी संतापला; म्हणाला, हिंमत असेल तर...
Mohammed Shami & Sania Mirza Marriage: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू मोहम्मद शमीने टेनिस स्टार सानिया मिर्झासोबतच्या लग्नाच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत.
![सानिया मिर्झासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर मोहम्मद शमी संतापला; म्हणाला, हिंमत असेल तर... Indian cricketer Mohammad Shami has reject the marriage rumors with tennis star Sania Mirza सानिया मिर्झासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर मोहम्मद शमी संतापला; म्हणाला, हिंमत असेल तर...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/20/ff36ca81f06b66887cbf10ab50f86bc71721462117083987_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mohammed Shami & Sania Mirza Marriage: गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) यांच्या लग्नाबाबत चर्चा सुरु आहेत. मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा आपापल्या जोडीदारापासून विभक्त झाले आहेत. त्यामुळे दोघंही लग्न करुन नवीन सुरुवात करणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा यांचा एक फोटोही व्हायरल करण्यात आला होता. या सर्व प्रकरणावर मोहम्मद चांगलाच संतापल्याचं पाहायला मिळालं.
भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू मोहम्मद शमीने टेनिस स्टार सानिया मिर्झासोबतच्या लग्नाच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. मोहम्मद शमीने शुभंकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत या विषयावर आपले मौन सोडले. लोक अनेकदा अशा गोष्टी मीम्स म्हणून पाहतात, पण हा एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित विषय आहे. हे मीम्स एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असू शकतात, त्यामुळे तुम्ही ते विचारपूर्वक बनवावे. ज्यांचे पेज व्हेरिफाय केलेले नाहीत तेच लोक अशा गोष्टी करतात. मी तुम्हाला आव्हान देतो की, तुमच्यात हिंमत असेल तर व्हेरिफाय असलेल्या प्रोफाइलवरुन फोटो शेअर करुन दाखवा, असं आव्हान देखील मोहम्मद शमीने दिलं आहे.
इतरांना खड्ड्यात ढकलणे सोपे-
शमी म्हणाला की, दुसऱ्या व्यक्तीला खड्ड्यात ढकलणे सोपे आहे, पण त्या लोकांनी स्वत: यश मिळवण्याचा विचार केला पाहिजे. इतरांचे पाय खेचण्यात या लोकांना जितकी मजा येते, मी त्यांना सांगू इच्छितो की, चार लोकांचे भविष्य त्यांच्या कुटुंबाचा आधार बनून सुधारा. जर त्यांनी इतर कोणाला मदत केली तर मी ते मान्य करेन, की तुम्ही एक चांगला माणूस आहे.
सानिया मिर्झाच्या वडिलांनीही फेटाळले होते वृत्त-
सानिया मिर्झाचे वडील इम्रान मिर्झा यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली असून लग्नाबाबत व्हायरल होणारं वृत्त खोटं असल्याचं म्हटलं आहे. इम्रान मिर्झा यांनी एका मीडिया मुलाखतीत सांगितले की, सानिया मोहम्मद शमीला कधी भेटली नाही. हा सगळा मूर्खपणा असल्याचं इम्रान मिर्झा यांनी सांगितले.
सानिया मिर्झाचा शोएब मलिकसोबत घटस्फोट-
जवळपास 6 महिन्यांपूर्वी तिने माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकला घटस्फोट दिला होता. शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले. त्याचे हे तिसरे लग्न आहे. 2010 मध्ये सानिया आणि शोएबचे लग्न झाले होते. या दोघांचे नाते सुमारे 14 वर्ष टिकले. शोएब आणि सानिया यांच्या नात्यात दोन वर्षांपासून हळूहळू दुरावा येण्यास सुरूवात झाल्याच्या चर्चा होत्या. एका मॉडेलसोबतचे स्विमिंग पूल मधील इंटिमेट फोटोशूट याला कारणीभूत ठरले होते. त्यानंतर सानिया-शोएब वेगळे होणार अशी सातत्याने चर्चा होती. त्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला.
संबंधित बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)