विश्वचषक गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूवर जर्मनीत सर्जरी; नेमकं काय घडलं?
Kuldeep Yadav: बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 मधील पाच कसोटी सामने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळले जाणार आहेत.
Kuldeep Yadav: भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) सध्या दुखापतीने त्रस्त आहे. कुलदीप यादववर नुकतीच जर्मनीत शस्त्रक्रिया झाली. कुलदीप यादवने सोशल मीडियाच्या माध्यमातून जर्मनीमधील काही फोटो शेअर केले होते. दुखापतीमुळे कुलदीप यादवला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या मालिकेत संघात स्थान मिळू शकले नाही.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 मधील पाच कसोटी सामने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळले जाणार आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये होणारी ही ट्रॉफी 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांसाठी ही मालिका खूप महत्त्वाची असेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या अंतिम सामन्यात दाखल व्हायचे असल्यास भारताला 4-1 अशा फरकाने ऑस्ट्रिलायविरुद्धची कसोटी मालिका जिंकावी लागेल.
View this post on Instagram
भारताचा ऑस्ट्रेलिया कसोटी दौरा पुढीलप्रमाणे -
पहिली कसोटी : 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी : 06-10 डिसेंबर, ॲडलेड
तिसरी कसोटी : 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी : 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी : 3-7 जानेवारी, सिडनी
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर जडेजा, आर. मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव खेळाडू : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.
BORDER GAVASKAR TROPHY. 😍🏆
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 21, 2024
- The prestigious BGT is here...!!! (Revsportz). pic.twitter.com/2tndXo1WMQ
कुलदीप यादवची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
कुलदीप यादव हा भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळणारा गोलंदाज आहे. आतापर्यंत त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 13 कसोटी, 106 एकदिवसीय आणि 40 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीच्या 24 डावांमध्ये कुलदीपने 22.16 च्या सरासरीने 56 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय, एकदिवसीय सामन्यांच्या 103 डावांमध्ये कुलदीपने 26.00 च्या सरासरीने 172 विकेट्स घेतल्या आहेत. टी- 20 आंतरराष्ट्रीय मधील उर्वरित 39 डावांमध्ये कुलदीपने 14.07 च्या सरासरीने 69 विकेट्स घेतल्या.
संबंधित बातमी:
Ind vs Aus 1st Test :BGT 2024: रोहित शर्मा- शुभमनग गिलनंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का, वेगवान गोलंदाज बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतून बाहेर