एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

BGT 2024: रोहित शर्मा- शुभमनग गिलनंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का, वेगवान गोलंदाज बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतून बाहेर

India vs Australia Border Gavaskar Trophy 2024: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे.  

India Squad Border Gavaskar Trophy पर्थ: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024 सुरु होण्यास केवळ दोन दिवस बाकी असताना टीम इंडियापुढील अडचणी थांबण्याची काही चिन्ह दिसत नाहीत. रोहित शर्मा वैयक्तिक कारणामुळं पहिल्या कसोटीत खेळणार नाही. तर, शुभमन गिल जखमी झाला असल्यानं तो पहिल्या कसोटीत खेळेल की नाही हे सांगता येत नाही. टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्केल यांनी शुभमन गिलसंदर्भात काही सांगता येत नाही, असं म्हटलं.टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे कारण वेगवान गोलंदाज खलील अहमद भारतात परत आला आहे. राखीव खेळाडू म्हणून त्याला संघात स्थान देण्यात आलं होतं. 

भारतीय संघानं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी मुकेश कुमार, नवदीप सैनी आणि खलील अहमद यांना राखीव खेळाडू म्हणून निवडलं होतं. मात्र,खलील अहमदला नेटमध्ये गोलंदाजी करताना समस्या जाणवल्यानं भारतात माघारी पाठवण्यात आलं आहे. त्याच्या जागी यश दयाळला राखीव खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आलं आहे. यश दयाळ न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेत देखील राखीव खेळाडू म्हणून भारतीय संघासोबत होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी देखील त्याची निवड झाली होती. खलील अहमदच्या दुखापतीमुळं यश दयाळ दक्षिण आफ्रिकेतून ऑस्ट्रेलियातील पर्थकडे रवाना झाला होता. 

पीटीआयच्या हवाल्यानं बीसीसीआयच्या सूत्रांनुसार एक वेगवान गोलंदाज रिप्लेस करण्यात आला आहे. कारण भारतीय संघाला मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी तयारी करायची आहे. यश दयाळ यापूर्वी भारत अ संघाकडून खेळणार होता, मात्र त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पाठवण्यात आलं. खलील अहमद गोलंदाजी करु शकत नसल्यास परत भारतात पाठवणं योग्य पर्याय होता, असं सांगण्यात आलं.  

खलील अहमद सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 मध्ये खेळणार की नाही हे स्पष्ट नाही. दिल्ली कॅपिटल्सनं खलील अहमदला संघातून रिलीज केलं आहे. पुढील आयपीएलमध्ये तो कोणत्या संघाकडून खेळतो हे पाहावं लागेल. दुसरीकडे यश दयाळला आरसीबीनं रिटेन केलं आहे. 

दरम्यान, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये यापूर्वी भारतानं विजय मिळवला आहे.  22 नोव्हेंबरपासून मालिकेला सुरुवात होणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाला ही मालिका जिंकणं आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ कशी कामगिरी करणार हे पाहावं लागेल. 

इतर बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Maharashtra Exit Poll 2024 | मुंबईत बिग फाईट, मविआला 18-19 तर महायुतीला 17-18 जागाMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे' Special ReportBaramati Vidhan Sabha | विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीत राजकारण आणि भावनांचा खेळ Special ReportDevendra Fadnavis : जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा भाजपला फायदा होतो:फडणवीस ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Embed widget