Indian Cricket Team Head Coach: वर्षभर भरपूर क्रिकेट, खूप दबाव...; भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाबाबत जस्टिन लँगर यांचं मोठं विधान
Indian Cricket Team Head Coach: ऑस्ट्रेलियाचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि लखनै सुपर जायंट्सचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
Indian Cricket Team Head Coach: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वरिष्ठ पुरुष भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. सध्या राहुल द्रविड (Rahul Dravid) भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहे. द्रविड यांचा कार्यकाळ जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2024 नंतर संपणार आहे. याबाबत आता नवीन अपडेट्स समोर येत आहे.
भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकासाठी अनेक नावे पुढे येत आहेत, ज्यात गौतम गंभीर आणि स्टीफन फ्लेमिंगसारख्या दिग्गजांच्या नावांचा समावेश आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि लखनै सुपर जायंट्सचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
जस्टिन लँगर काय म्हणाले?
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपद ही क्रिकेट विश्वातील बहुधा सर्वात मोठी जबाबदारी आहे. वर्षभर भरपूर क्रिकेट असते आणि लोकांच्या अपेक्षाही खूप असतात. हे एक मोठे आव्हान असेल, पण ते मजेदारही असेल आणि आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची उत्तम संधी असेल. परंतु या सर्व गोष्टींसोबतच वेळही योग्य असायला हवी. चार वर्षे मी ऑस्ट्रेलियन संघासोबत मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. हे खूप व्यापक आणि थकवणारे काम आहे. भारतीय संघावर विजयासाठी खूप दबाव आहे, असं लँगर यांनी सांगितले. लँगर यांनी आयपीएलची विश्वचषकाशी तुलना करून त्याचे कौतुक केले आणि जगातील सर्वोत्तम देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा असल्याचे सांगितले. या मोसमात खराब कामगिरी करूनही लखनौ सुपर जायंट्स स्पर्धेतून बाहेर पडल्याबद्दल त्याने खंत व्यक्त केली.
बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही पात्रता आणि अटी निश्चित केल्या आहेत आणि त्या पुढीलप्रमाणे आहेत-
- किमान 30 कसोटी किंवा 50 एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव असावा.
- किमान दोन वर्षे पूर्ण सदस्य चाचणी खेळणाऱ्या देशाचे मुख्य प्रशिक्षक असले पाहिजेत.
- किमान 3 वर्षे आयपीएल संघ किंवा त्याच्या समकक्ष आंतरराष्ट्रीय लीग किंवा प्रथम श्रेणी संघ किंवा राष्ट्रीय अ संघाचे सहयोगी सदस्य किंवा मुख्य प्रशिक्षक असणे आवश्यक आहे.
- वय 60 वर्षांपेक्षा कमी असावे.
संबंधित बातम्या:
आयपीएलमधील यशस्वी प्रशिक्षक घेणार राहुल द्रविडची जागा; बीसीसीआय करतेय चतुर दिग्गजाचा विचार
किमान 1 वर्ष तरी...; वरिष्ठ खेळाडूंची विनंती, पण राहुल द्रविडचा नकार, पुढील प्रशिक्षकपदी कोण?