Ravi Shastri Test Positive: टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री कोविड पॉझिटिव्ह, शास्त्रींसह 4 सदस्य आयसोलेट
Ravi Shastri Test Positive: रवी शास्त्री यांची लेटरल फ्लो टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर शास्त्रीसह बी अरुण, प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल यांना खबरदारी म्हणून आयसोलेट केलंय.
Ravi Shastri Test Positive: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री यांची लेटरल फ्लो टेस्ट काल शनिवारी संध्याकाळी पॉझिटिव्ह आली, त्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने खबरदारी म्हणून मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह चार आयसोलेट केलं आहे.
बीसीसीआयने रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक बी अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल यांना आयसोलेट केलं आहे. बीसीसीआयने सांगितले की त्यांची आरटी-पीसीआर चाचणी झाली आहे आणि ते टीम हॉटेलमध्ये राहणार आहे. मात्र, वैद्यकीय संघाकडून याची पुष्टी होईपर्यंत कोरोना संशयित टीम इंडियासोबत प्रवास करणार नाही.
बीसीसीआयच्या मते, टीम इंडियाच्या उर्वरित सदस्यांची काल रात्री आणि दुसऱ्यांची सकाळी चाचणी घेण्यात आली. टीम इंडिया सध्या इंग्लंडविरुद्ध चौथा कसोटी सामना खेळत आहे. अशा परिस्थितीत, निगेटिव्ह कोविड अहवाल असलेल्या सदस्यांना ओव्हल येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पाच कसोटी सामन्यांची मालिका
भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. इंग्लंडविरुद्ध खेळली जाणारी पाच कसोटींची मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे आणि दोन्ही संघांमध्ये चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघ मजबूत स्थितीत असल्याचे दिसत आहे.
चौथ्या कसोटीत भारतीय फलंदाजांची चांगली कामगिरी
दरम्यान, कालच्या दिवशी भारतीय फलंदाजांनी कामगिरी चांगली केली. केएल राहुल आणि रोहित शर्माने पहिल्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी केली. राहुल 101 बॉलमध्ये एक षटकर आणि सहा चौकरासह 46 धावा करत तंबुत परतला. जेम्स एन्डरसनने राहुलला बाद केले. त्यानंतर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या विकेटसाठी 153 धावा केल्या. दरम्यान रोहित शर्माने पहिल्यांदा विदेशातील आपले कसोटी शतक पूर्ण केले. रोहितने 204 बॉलमध्ये एक षटकरासह आणि 12 चौकरासह आपले शतक पूर्ण केले. टेस्ट क्रिकेटमध्ये रोहितने आठवे शतक पूर्ण केले.