IND vs WI : हार्दीक पांड्या कर्णधार, पाचव्या टी20 मध्ये भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय, पाहा अंतिम 11
India vs West Indies : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात पाचवा टी20 सामना पार पडत आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे.
India vs West Indies LIVE : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील पाचव्या टी20 सामन्यात नुकतीच नाणेफेक पार पडली असून भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार हार्दीकने दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ खेळाडू विश्रांतीवर असून कर्णधार रोहितही त्यामुळे अंतिम 11 मध्ये नाही. चार बदलांसह भारत मैदानात उतरला आहे.
विशेष म्हणजे कुलदीप यादवला संधी मिळाली आहे. तसंच ईशान, श्रेयस आणि दीपक हुडाला संघात घेतलं आहे. रोहित शर्मा, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव आणि भुवनेश्वर कुमार विश्रांतीवर आहेत. तर नेमका संघ कसा आहे पाहूया...
भारतीय संघ - ईशान किश, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दीक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, अक्षर पटेल, आवेश खान, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, आणि अर्शदीप सिंह
वेस्ट इंडीज संघ - काइल मेयर्स, ब्रँडन किंग, निकोलस पूरन (कर्णधार), जेसन होल्डर, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, डॉमनिक ड्रेक्स, ओबेद मकॉय, डेवॉन थॉमस, अल्झारी जोसेफ, अकेल हुसेन.
भारत मालिकेत विजयी
पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिला, तिसरा आणि चौथा सामना जिंकत 3-1 ची विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिका आधीच भारताच्या खिशात गेली आहे. पण आजचा सामना जिंकून एका मोठ्या फरकाने मालिका विजयाचा भारताचा निश्चय असेल, दुसरीकडे वेस्ट इंडीज अखेरचा सामना जिंकून दौऱ्याचा शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात आहे.
हे देखील वाचा-