(Source: Poll of Polls)
IND W vs TH W, Womens Asia Cup 2022: दीप्ती शर्माचा 'वन वूमन शो', मलेशिया महिलांच्या डोळ्यात आणलं पाणी; भारताचा 74 धावांनी विजय
IND W vs TH W, Womens Asia Cup 2022: थायलँडविरुद्ध विजयासह भारतीय महिला संघानं महिला आशिया चषकातील अंतिम सामन्यात धडक दिलीय.
IND W vs TH W, Womens Asia Cup 2022: महिला आशिया चषकातील पहिल्या सेमीफायनल सामन्यात भारतानं मलेशियाचा (India Womens vs Thailand Womens) 74 धावांनी पराभव करत फायनलमध्ये धडक दिलीय. सिल्हेट आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये (Sylhet International Cricket Stadium) खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय महिलांनी थायलँडसमोर 149 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना मलेशियाच्या संघाची दमछाक झाली. मलेशियाच्या संघाला 20 षटकात 9 विकेट्स गमावून अवघ्या 74 धावांपर्यंत मजल मारता आली. दरम्यान, तुफान फॉर्ममध्ये असलेल्या दिप्ती शर्मानं (Deepti Sharma) या सामन्यातही जबरदस्त गोलंदाजी केली.
ट्वीट-
𝐈𝐍𝐓𝐎 𝐓𝐇𝐄 𝐅𝐈𝐍𝐀𝐋 🙌 🙌
— BCCI Women (@BCCIWomen) October 13, 2022
A superb bowling performance from #TeamIndia to beat Thailand by 7️⃣4️⃣ runs in the #AsiaCup2022 Semi-Final 👏👏 #INDvTHAI
Scorecard ▶️ https://t.co/pmSDoClWJi
📸 Courtesy: Asian Cricket Council pic.twitter.com/NMTJanG1sc
नाणेफेक जिंकून थायलँडच्या संघानं भारतीय महिलांना प्रथम फंलदाजीचं आमंत्रण दिलं. त्यानंतर भारतीय सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्टार फलंदाज स्मृती मानधनानं संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेट्ससाठी 38 धावांची भागेदारी केली. परंतु, चौथ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर फनिता मायानं स्मृती मानधनाच्या रुपात भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर नवव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर शेफाली वर्मानंही आपली विकेट्स गमावली. तिनं 28 चेंडूत 42 धावांची तुफानी खेळी केली. जेमिमाह रॉड्रिग्स आणि कर्णधार हरमनप्रीत कौरनं संघाचा डाव पुढं नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, चौदाव्या षटकात थिपत्चा पुत्थावोन्ग रॉड्रिग्जला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर हरमनप्रीत कौरही बाद झाली.अखेरच्या काही षटकात पूजा वस्त्राकरची फटकेबाजी पाहायला मिळाली. ज्यामुळं भारतानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून थायलँडसमोर 149 धावांचं लक्ष्य ठेवलं. थायलँडकडून सोर्नारिन टिपोचनं उत्कृष्ट गोलंदाजी केली. तिनं आपल्या संघासाठी सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
भारताची भेदक गोलंदाजी
भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या थाडलँडच्या संघानं भारतीय गोलंदाजीसमोर गुडघे टेकले. प्रत्युत्तरात थायलँड महिलांना 8 विकेट्स गमावून फक्त 74 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताकडून दिप्ती शर्मानं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, राजेश्वरी गायकवाडच्या खात्यात दोन विकेट्स जमा झाल्या. रेणुका सिंह आणि शेफाली वर्मा यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली. हा संपूर्ण सामना एकतर्फी ठरला.
हे देखील वाचा-