(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs SL 2nd Test Live: भारत- श्रीलंका यांच्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर
India vs Sri Lanka 2nd Test Score Live: भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरुच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्डेडिअमवर (M.Chinnaswamy Stadium) दोन सामन्यांच्या मालिकेतील अखरेचा सामना खेळला जात आहे.
LIVE
Background
IND vs SL 2nd Test Live: भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरुच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्डेडिअमवर (M.Chinnaswamy Stadium) दोन सामन्यांच्या मालिकेतील अखरेचा सामना खेळला जात आहे. आजचा सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्यासाठी मैदानात उतरलाय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिलीच कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघानं एक डाव आणि 222 धावांनी विजय मिळवला होता. पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजानं चमकदार कामगिरी केली होती.
विराट कोहलीच्या शतकाचा दुष्काळ संपण्याची शक्यता
श्रीलंकाविरुद्ध खेळला जाणार दुसरा एकदिवसीय सामना विराट कोहलीसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. कारण, या विराट कोहलीनं आयपीएलमध्ये रॉयल चॅलेजर्सकडून खेळताना या मैदानात जास्त वेळ घालवला आहे. तसेच या मैदानावर विराट कोहलीनं 16 कसोटी, 21 एकदिवसीय आणि 25 टी-20 सामने खेळले आहेत. विराटनं मागील 28 महिन्यापासून एकही शतक झळकावलं नाही. मात्र, या सामन्यात तो शतक ठोकून शतकांचा दुष्काळ संपवण्याची शक्यता आहे.
भारताचा कसोटी संघ:
मयंक अग्रवाल, रोहित शर्मा (कर्णधार), हनुमा विहारी, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.
श्रीलंकेचा कसोटी संघ
दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चरिथ असलंका, निरोशन डिकवेला (विकेटकीपर), सुरंगा लकमल, लसिथ एम्बुल्डेनिया, विश्व फर्नांडो, प्रवीण जयविक्रमा.
IND vs SL : दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेचा पहिला डाव 109 धावांवर गुंडाळला, भारताला मोठी आघाडी, बुमराहनं उडवली लंकेची दाणादाण
IND vs SL : दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेचा पहिला डाव 109 धावांवर गुंडाळला, भारताला मोठी आघाडी, बुमराहनं उडवली लंकेची दाणादाण
पहिल्या दिवसाचा खेळ संपला
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 59.1 षटकांत सर्वबाद 252 धावा केल्या. प्रत्युत्तरदाखल खेळणाऱ्या श्रीलंका संघाची सुरुवातही खराब झाली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंका संघाने 30 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 86 धावा केल्या आहेत. भारताकडून श्रेयस अय्यरने एकाकी झुंज देत 92 धावांची खेळी केली. तर श्रीलंकेकडून एँजलो मॅथ्यूजने 43 धावांची खेळी केली.
श्रीलंकेला आणखी एक धक्का
जसप्रीत बुमराहने श्रीलंकेला आणखी एक धक्का दिला आहे. बुमराहने मॅथ्युजला 43 धावांवर रोहित शर्माकरवी झेलबाद केले आहे.
श्रीलंकेचा अर्ध संघ तंबूत
भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेचा अर्ध संघ तंबूत परतला आहे. 50 धावांत लंकेचे पाच फलंदाज बाद झाले आहेत. बुमराह आणि शामीने दोन तर अक्षर पटेलने एक विकेट घेतली
श्रीलंकेला मोठा धक्का, कर्णधार तंबूत
बुमराहनंतर मोहम्मद शामीने श्रीलंकेला धक्का दिला आहे. शामीने श्रीलंकेचा कर्णदार दिमुथ करुणारत्ने याला बाद केले आहे. 14 धावांत श्रीलंकेचे तीन गडी माघारी परतले