IND vs SL, 2nd T20I Live updates : भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या टी20 सामन्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर
IND vs SL, 2nd T20 Live Streaming : वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप दिल्यानंतर श्रीलंकेचा व्हाईट वॉश करण्यास टीम इंडिया सज्ज झाली आहे. पाहा दुसऱ्या टी20 सामन्यातील प्रत्येक अपडेट्स फक्त एका क्लिकवर
LIVE
Background
IND vs SL, 2nd T20 Live Streaming : वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप दिल्यानंतर श्रीलंकेचा व्हाईट वॉश करण्यास टीम इंडिया सज्ज झाली आहे. धर्मशाला मैदानावर भारताचा दुसरा टी20 सामना होणार आहे. पहिला सामना जिंकत टीम इंडियाने मालिकेत आघाडी घेतली आहे. तीन सामन्याच्या मालिकेत भारतीय संघाने 1-0 च्या फरकाने आघाडी घेतली आहे. भारतीय संघ दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. तर श्रीलंका संघ मालिकेत बरोबरी करण्यासाठी मैदानात उतरले.
लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारतानं 62 धावांनी श्रीलंकेला पराभूत केलं. या विजयासह भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. धर्मशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदानावर भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना खेळला जाणार आहे.
कोणाचं पारड जड?
भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या टी-20 मालिकेत भारतानं सर्वाधिक विजय मिळवले आहेत. तर, श्रीलंकेच्या संघानं भारताविरुद्ध निराशाजनक कामगिरी केलीय. भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 23 टी-20 सामने खेळण्यात आले. यापैकी 15 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, सात सामन्यात पराभावाची धुळ चाखली आहे.
दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड संघाबाहेर -
टीम इंडिया एकापाठोपाठ एक विजय संपादन करत आहे. वेस्ट इंडिजला 3-0 च्या फरकाने धूळ चारल्यानंतर श्रीलंकाविरोधातील पहिल्या सामन्यात विजय मिळवला. एकीकडे संघ दमदार कामगिरी करत असताना खेळाडू दुखापतग्रस्त होत आहेत. आता सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, ऋतुराज गायकवाडच्या जागी सलामी फलंदाज मयांक अग्रवाल याला संधी देण्यात आला आहे. मयांकला बॅकअप सलाम फलंदाज म्हणून बोलवण्यात आले आहे. 26 फेब्रुवारी आणि 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यासाठी मयांक टीम इंडियात दाखल झाला आहे.
भारतीय संघाला दुखापतीचे ग्रहण -
ऋतुराज गायकवाडआधी दुखापतीमुळे उपकर्णधार के.एल राहुल आणि वॉशिंगटन सुंदर श्रीलंका मालिकेला मुकले आहेत. त्यानंतर सुर्यकुमार यादव आणि दीपक चाहरला दुखापतीमुळे मालिका अर्ध्यावर सोडावी लागली होती
IND vs SL : भारतीय संघाचा सात विकेटने विजय
IND vs SL, 2nd T20I : श्रेयस अय्यरच्या तुफानी अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने श्रीलंका संघाचा सात गड्यांनी पराभव केला.
भारतीय संघ विजयाच्या जवळ
IND vs SL, 2nd T20I : भारतीय संघ विजयाजवळ पोहचला आहे. भारताला विजयासाठी फक्त 8 धावांची गरज
भारताला तिसरा धक्का
IND vs SL, 2nd T20I : भारतीय संघाला तिसरा धक्का बसला आहे. संजू सॅमसन 39 धावांवर बाद
श्रेयसचे अर्धशतक
श्रेयसचे तुफानी अर्धशतक, भारत विजयाजवळ
भारताला दुसरा धक्का
IND vs SL, 2nd T20I : भारतीय संघाला दुसरा धक्का बसला आहे. रोहित शर्मा पाठोपाठ ईशान किशनही बाद झाला आहे. ईशान किशनने 16 धावांची खेळी केली. भारतीय संघाच्या दोन बाद 44 धावा