एक्स्प्लोर

IND vs SL, 3rd T20 : तिसऱ्या टी20 सामन्यात भारताचा 91 धावांनी विजय, मालिकाही 2-1 ने घातली खिशात

IND vs SL T20 : भारतानं श्रीलंका संघाला तिसऱ्या टी20 सामन्यात मात दिली आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवने केलेल्या धमाकेदार शतकाच्या जोरावर भारताचा विजय सोपा झाला.

India vs Sri Lanka, 3rd T20 :  भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) तिसऱ्या टी20 सामन्यात भारतानं धावांनी विजय मिळवत सामना जिंकला आहे. तसंच तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने जिंकत मालिकाही 2-1 अशा फरकानं नावावर केली आहे. सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत 228 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यानंतर 229 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंका संघाला 16.4 षटकांत 137 धावाच करता आल्या, ज्यामुळे भारत 91 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. भारताकडून सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) नाबाद 112 धावा केल्या तर अर्शदीप सिंहने 3 आणि उमरान मलिक, हार्दिक पांड्या, चहल यांनी प्रत्येकी 2 आणि अक्षर पटेलने 1 विकेट घेतली.

सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजची खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त असल्याने प्रथम फलंदाजी करुन एक मोठी धावसंख्या उभारण्याचा निर्धार केला होता. भारतीय फलंदाजानी दमदार फलंदाजी करत एक मोठी धावसंख्या उभारली. यामध्ये सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 112 धावा केल्या. सूर्याने 51 चेंडूत 9 षटकार 7 चौकार ठोकत नाबाद 112 धावा केल्या. सलामीवीर ईशान किशन 1 धाव करुन बाद झाल्यावर राहुल त्रिपाठीने छोटी पण स्फोटक खेळी केली. 35 धावा करुन तो बाद झाला. मग सूर्या आणि गिलने डाव सावरला. गिल 46 धावा करुन बाद झाला. मग पांड्या आणि हुडा स्वस्तात बाद झाले. अक्षरच्या नाबाद 21 धावांनी भारताची धावसंख्या 228 पर्यंत नेली.

ज्यानंतर श्रीलंकेचा संघ फलंदाजीसाठी मैदानात आल्यापासून एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. एकही फलंदाज 30 हून अधिक धावसंख्या करु शकला नाही. कुसल मेंडिस आणि दासून शनाका यांनी सर्वाधिक 23 धावा केल्या. पण 229 हे मोठे लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने एकाही फलंदाजांने खास फलंदाजी केली नसल्याने अखेर श्रीलंकेचा संघ 91 धावांनी पराभूत झाला. या सामन्यात विजयासह भारताने मालिकाही 2-1 अशी जिंकली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Team India (@indiancricketteam)

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
Ind vs Sl 1st Test : पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Embed widget