IND Vs SA 3rd T20I : मॅच वेळ पुन्हा बदलली! भारत-दक्षिण आफ्रिका तिसऱ्या सामना कधी सुरू होणार? जाणून घ्या सर्वकाही
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांची टी-20 मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहे.
India vs South Africa 3rd T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांची टी-20 मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 61 धावांनी दणदणीत विजय नोंदवला. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दमदार पुनरागमन करत भारताचा 3 विकेट राखून पराभव केला. आता तिसरा सामना 13 नोव्हेंबरला सेंच्युरियन मैदानावर होणार आहे. मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे, दोन्ही संघ टी-20 क्रिकेटमध्ये तज्ञ असलेल्या सुपरस्टार खेळाडूंनी भरलेले आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-20 सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू झाला होता. मात्र तिसऱ्या टी-20 सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. हा सामना एका तासानंतर भारतीय वेळेनुसार 8:30 वाजता सुरू होईल आणि या सामन्याचा नाणेफेक रात्री 8 वाजता होईल. अशा परिस्थितीत हा सामना रात्री उशिरापर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. यानंतर, दोन्ही संघांमधील चौथा टी-20 सामना 15 नोव्हेंबर रोजी होणार आहे, जो भारतीय वेळेनुसार सकाळी 8.30 वाजता खेळला जाईल.
Gqeberha ✈️ Centurion
— BCCI (@BCCI) November 12, 2024
A journey ft. smiles and birthday celebrations 😃🎂#TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/KnP1Bb1iA1
सेंच्युरियन मैदानावर आतापर्यंत एकूण 16 टी-20 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 8 जिंकले आहेत. तर सातवेळा प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. या मैदानावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे. संघाने 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 259 धावा केल्या होत्या.
दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचे फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत. 100 धावांचा टप्पा पण संघानी कसा तरी पार केला होता. त्यावेळी हार्दिक पांड्याने सर्वाधिक 39 धावांची खेळी खेळली होती. नंतर वरुण चक्रवर्तीने टीम इंडियाला सामन्यात पुनरागमन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि त्याने आपल्या 4 षटकात 17 धावा देत 5 बळीही घेतले. मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्यावेळी वेगवान गोलंदाज हा संघाचा कमकुवत दुवा असल्याचे सिद्ध झाले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, आवेश खान, जितेश शर्मा, विजयकुमार वैशाख, रमनदीप सिंग, यशोद सिंह, विजयकुमार वैशाख.
हे ही वाचा -
Champions Trophy 2025: पाकिस्तान बीसीसीआयशी संबंध तोडणार; लवकरच मोठे पाऊल उचलणार, ICC ला परवडणार?