World Cup आधी 3 वेळा भारत-पाकिस्तान आमने-सामने, पाहा कधी, कुठे होणार लढत?
India vs Pakistan : राजकीय संबंधामुळे दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका होत नाहीत. त्यामुळे जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये लढत होते, तेव्हा तेव्हा चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असते.
![World Cup आधी 3 वेळा भारत-पाकिस्तान आमने-सामने, पाहा कधी, कुठे होणार लढत? india vs pakistan three matches in asia cup 2023 ind vs pak babar azam rohit sharma icc odi world cup World Cup आधी 3 वेळा भारत-पाकिस्तान आमने-सामने, पाहा कधी, कुठे होणार लढत?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/7/2017/10/19164125/India-vs-Pakistan.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India vs Pakistan Asia Cup 2023 Matches : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे क्रीडा चाहत्यांना मोठी मेजवानी असते. राजकीय संबंधामुळे दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका होत नाहीत. त्यामुळे जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये लढत होते, तेव्हा तेव्हा चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांचा सामना होणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथीन नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हे दोन संघ भिडणार आहेत. याची तयारी चाहत्यांनी सुरु केली आहे. पण, विश्वचषकापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कमीत कमी तीन क्रिकेट सामने होण्याची शक्यता आहे. विश्वचषकाआधी आशिया चषक होणार आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये आहेत.
31 ऑगस्ट 2023 ते 17 सप्टेंबर 2023 यादरम्यान आशिया चषक रंगणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्थान आणि नेपाळ या देशांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. 13 एकदिवसीय सामन्यानंतर आशियाचा किंग कोण ? यावरुन पडदा उठणार आहे.
भारत-पाकिस्तान तीन वेळा आमनेसामने -
आशिया चषकामध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान एकाच गटामध्ये आहेत. अ गटामध्ये भारत, पाकिस्तान आणि नेपाळ संघ आहे. तर ब गटामध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका असे तीन संघ आहेत. आशिया चषकामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तीन सामने रंगण्याची शक्यता आहे. साखळी फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होईल. त्यानंतर सुपर - 4 मध्ये पुन्हा एकदा आमनेसामने येतील... जर सुपर 4 मध्ये दोन्ही संघाने गुणतालिकेत आघाडीवर स्थान पटकावले तर आशिया चषकाची फायनल भारत आणि पाकिस्तान यांच्यात होण्याची शक्यता आहे.
लवकरच आशिया चषकाचे वेळापत्रक जारी करण्यात येणार आहे. 31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर यादरम्यान आशिया चषक रंगणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, लीगस्टेजमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील पहिला सामना 2 किंवा 3 सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. सुपर 4 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 9 सप्टेंबर किंवा 10 सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान फायनलमध्ये गेल्यास 17 सप्टेंबर रोजीही लढत पाहायला मिळू शकते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सर्व सामने श्रीलंकामध्ये होणार आहेत.
आशिया चषकाचे वेळापत्रक कधी ?
31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर यादरम्यान आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. आशिया चषकाच्या वेळापत्रकाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. पण 19 जुलै रोजी वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)