Ind vs Pak : क्रिकेटच्या मैदानात आज रात्री रंगणार हायव्होल्टेज भारत-पाकिस्तान सामना, जाणून घ्या कुठे पाहू शकता LIVE
Emerging Asia Cup 2024 India A vs Pakistan A Date Live Streaming : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांसाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये एक वेगळीच उत्सुकता पाहायला मिळत आहे.
IND vs PAK Match Live Streaming : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांसाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये एक वेगळीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. आता आज इमर्जिंग आशिया कप 2024 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. जिथे दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. हा शानदार सामना कधी, कुठे आणि कोणत्या वेळी पाहू शकता? जाणून घेऊया.
सामना किती वाजता होणार सुरू?
पुरुषांच्या इमर्जिंग आशिया कप 2024 मधील भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ सामना आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:00 वाजता खेळला जाईल.
भारत-पाकिस्तान सामना लाइव्ह कुठे पाहता येईल?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणारा सामना तुम्ही घरबसल्या आरामात थेट Disney + Hotstar वर पाहू शकता.
8 संघ 2 गट
इमर्जिंग आशिया कप 2024 चे आयोजन ओमान करणार आहे. यामध्ये एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. त्यात भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ओमान, यूएई, अफगाणिस्तान, हाँगकाँग, श्रीलंका या संघांचा समावेश आहे, ज्यांची 2 गटात विभागणी करण्यात आली आहे. 18 ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. जिथे पहिला सामना बांगलादेश आणि हाँगकाँग यांच्यात होणार आहे.
अ गटात अफगाणिस्तान, बांगलादेश, हाँगकाँग आणि श्रीलंका आहे. तर, ब गटात भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि यूएईमध्ये खेळले जाणार आहेत.
पाकिस्तान विरूद्ध ही असू शकते भारताची प्लेइंग-इलेव्हन - अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग, तिलक वर्मा (कर्णधार), आयुष बडोनी, नेहल वढेरा, निशांत सिंधू, रमणदीप सिंग, राहुल चहर, साई किशोर, वैभव अरोरा, रसिक सलाम.
दोन्ही संघ -
पाकिस्तान अ : मोहम्मद हारिस (कर्णधार), अब्दुल समद, अहमद दानियाल, अराफत मिन्हास, हैदर अली, हसिबुल्ला, मेहरान मुमताज, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद इम्रान जूनियर, ओमेर बिन युसूफ, कासिम अक्रम, शाहनवाज दहनी, सुफियान मोकीम, यासिर खान आणि जमान खान.
भारत अ : तिलक वर्मा (कर्णधार), अभिषेक शर्मा, आयुष बडोनी, निशांत सिंधू, अनुज रावत, प्रभसिमरन सिंग, नेहल वढेरा, अंशुल कंबोज, हृतिक शौकीन, आकिब खान, वैभव अरोरा, रसिक सलाम, साई किशोर, राहुल चहर.
हे ही वाचा -