WTC 2025 Points Table : पाकिस्तानच्या विजयाने बदलले WTC 2025 पॉइंट्स टेबलचे समीकरण; इंग्लडला दणका, टीम इंडिया आहे तरी कुठे?
पाकिस्तानने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा 152 धावांनी पराभव केला. पाकिस्तानच्या विजयानंतर WTC 2025 पॉइंट्स टेबलचे समीकरण थोडेसे बदलले आहे.
WTC 2025 Points Table Pakistan vs England 2nd Test : इंग्लंडचा संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. जिथे दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील दुसरा सामना मुलतान स्टेडियमवर खेळला गेला. जो पाकिस्तानने 152 धावांनी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. पाकिस्तानच्या विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 फायनलच्या पॉइंट टेबलमध्येही बदल दिसून आले. पाकिस्तानला थोडा फायदा झाला आहे, तर इंग्लंडला पराभवासह नुकसान सहन करावे लागले आहे.
Pakistan spinners rattle England's pursuit of 297.#WTC25 | #PAKvENG 📝: https://t.co/UQ21K8IlDc pic.twitter.com/vd46KwLCpm
— ICC (@ICC) October 17, 2024
पहिल्या सामन्यातील पराभवानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 फायनलच्या पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तानची स्थिती खूपच वाईट झाली होती. पण दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानने आता एक स्थानवर झेप घेतली आहे. आता पाकिस्तानचा संघ 9व्या स्थानावरून 8व्या स्थानावर पोहोचला आहे. याशिवाय, इंग्लंड अजूनही चौथ्या स्थानावर आहे, परंतु संघाच्या विजयाची टक्केवारी कमी झाली आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडची विजयाची टक्केवारी 45.59 होती, जी आता 43.06 झाली आहे.
Multan Cricket Stadium honours board updated by Noman Ali, Sajid Khan and @shani_official after Pakistan's win in the second Test 🏟️✍️#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/yc4uO7GUpd
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 18, 2024
भारत पहिल्या स्थानावर
भारतीय संघ सध्या न्यूझीलंडसोबत तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. याआधी टीम इंडियाने बांगलादेशचा कसोटी मालिकेत 2-0 असा पराभव केला होता. सध्या टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 फायनलच्या पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे आणि टीमची विजयाची टक्केवारी 74.24 आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर राहिला. ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी 62.50 आहे. तर श्रीलंकेचा संघ 55.56 टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
Post-victory moments as Pakistan level the series in Multan with a Test to go 🙌#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/Z5ts1q5wdV
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 18, 2024
साजिद खान ठरला सामनावीर
साजिद खानने दुसऱ्या कसोटी सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात साजिद खानने 9 विकेट घेतल्या. साजिदने पहिल्या डावात 7 तर दुसऱ्या डावात 2 बळी घेतले. याशिवाय त्याने फलंदाजी करताना दोन्ही डावात मिळून 24 धावा केल्या.
हे ही वाचा -