IND vs PAK : 2026 मध्ये भारत पाकिस्तान किती वेळा आमने सामने येणार, सर्व सामन्यांच्या तारखा नोंदवून ठेवा
India vs Pakistan Cricket Schedule 2026: भारत आणि पाकिस्तान 2026 मध्ये किती वेळा आमने सामने येणार हे जाणून घेणार आहोत.

नवी दिल्ली : 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान अनेकदा आमने सामने आले. भारत आणि पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया कप, महिला वनडे वर्ल्ड कप दरम्यान आमने सामने आल्या. 2025 मध्ये भारतानं पाकिस्तानला पराभूत केलं. भारताच्या पुरुष संघानं आशिया कपमध्ये पाकिस्तानचा अंतिम फेरीत पराभूत करत विजेतेपद मिळवलं. 2026 मध्ये देखील दोन्ही देशांचे संघ आमन सामने येणार आहेत.
भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशातील संबंध बिघडलेले आहेत. दोन्ही देशाच्या क्रिकेट टीममध्ये गेल्या अनेक वर्षांपासून द्वीपक्षीय मालिका झालेली नाही. त्यामुळं भारत आणि पाकिस्तान आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये आमने सामने येतात.
2026 मध्ये भारत आणि पाकिस्तान किती वेळा आमने सामने?
अंडर-19 मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप
2026 मध्ये मोठ्या क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. अंडर 19 मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप 15 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान वेगवेगळ्या संघात आहेत. नॉकआऊट राऊंडमध्ये ते आमने सामने येऊ शकतात.
टी 20 वर्ल्ड कप : भारत आणि श्रीलंका यांच्याकडून 7 फेब्रवारी ते 8 मार्च दरम्यान टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन केलं जाणार आहे. भारत, पाकिस्तान, नामीबिया, नेदरलँडस, अमेरिका हे संघ एकाच ग्रुपमध्ये आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 15 फेब्रुवारीला होणार आहे. याशिवाय सुपर-8 मध्ये किंवा टी 20 वर्ल्ड कपच्या नॉक आऊट सामन्यांमध्ये भारत पाकिस्तान आमने सामने येऊ शकतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 15 फेब्रुवारीचा सामना कोलंबो येथे होईल. दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचल्यास ती लढत देखील श्रीलंकेत पार पडेल.
महिला टी 20 वर्ल्ड कप : महिला टी 20 वर्ल्ड कप 12 जून ते 5 जुलै दरम्यान होणार आहे. भारत आणि पाकिस्तानसह 6 संघ अ गटात आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान महिला क्रिकेट टीममधील सामना 14 जूनला होणार आहे.




















