'Bharat First Always....' एक सामना रद्द, दोन झटके! स्पॉन्सरनं जे केलं ते ऐकून पाकिस्तानची झोप उडाली
India vs Pak match Legends Championship : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2025चं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर संपूर्ण क्रिकेटविश्व 20 जुलैची आतुरतेनं वाट पाहत होतं.

India vs Pak match Legends Championship called off : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2025चं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर संपूर्ण क्रिकेटविश्व 20 जुलैची आतुरतेनं वाट पाहत होतं. कारणही तसंच होतं, वर्षानुवर्षांनंतर भारत आणि पाकिस्तानमधील दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये 22 यार्डांच्या मैदानावर भिडणार होते. मात्र, हा बहुचर्चित सामना होण्याच्या आदल्या दिवशीच भारतीय संघातील अनेक माजी खेळाडूंनी थेट या सामन्यात सहभागी होण्यास नकार दिला.
भारताचे स्टार्स सामन्यातून बाहेर, सामना थेट रद्द
हरभजन सिंह, शिखर धवन, सुरेश रैना यांच्यासह एकूण पाच खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्धचा सामना बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, आयोजकांना हा हाय व्होल्टेज सामना रद्द करावा लागला. आधीच इंग्लंडच्या भूमीवर झालेल्या बदनामीची जखम न भरलेला पाकिस्तान आता पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.
सामना रद्द झाल्यानंतर पाकिस्तानला दुसरा झटका
सामना रद्द होणं ही पाकिस्तानसाठी एक मोठी ठिणगी होतीच, पण त्यानंतर आणखी एक धक्का बसला जो म्हणजे स्पॉन्सर कंपनीकडून. ‘EaseMyTrip’ या स्पॉन्सर कंपनीनं आपल्या एक्स (पूर्वीचं ट्विटर) हँडलवरून जाहीर केलं की, ते अशा कोणत्याही सामन्याचा प्रचार किंवा समर्थन करणार नाहीत, ज्यात पाकिस्तान संघ सहभागी असेल.
EaseMyTrip ने लिहिलं की, “वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्ससोबत आमचं पाच वर्षांचं करार असूनही, दोन वर्षांपूर्वीच आम्ही आमचं धोरण स्पष्ट केलं होतं, EaseMyTrip कधीही त्या सामन्याचं प्रमोशन करणार नाही, ज्यात पाकिस्तान संघ खेळणार आहे. इंडिया चॅम्पियन्स संघाला साथ देणं ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आमच्या काही मूल्यांमुळे आम्ही अशा सामन्याला पाठिंबा देणार नाही.”
Official Statement from EaseMyTrip
— EaseMyTrip.com (@EaseMyTrip) July 19, 2025
Despite entering into a 5-year sponsorship agreement with the World Championship of Legends (WCL) two years ago, our stance has always been clear—EaseMyTrip will not be associated with or participate in any WCL match involving Pakistan
We…
शिखर धवनसह अनेक दिग्गजांचा ठाम निर्णय
20 जुलै रोजी एजबस्टनच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तानमध्ये लिजेंड्सचा थरार पाहायला मिळणार होता. पण त्याआधीच शिखर धवनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत स्पष्ट केलं की तो या सामन्यात खेळणार नाही. शिखर धवन म्हणाला की, “11 मे रोजी घेतलेल्या निर्णयावर मी आजही ठाम आहे. माझ्यासाठी माझं देशप्रेम सर्वात मोठं आहे. देशापेक्षा मोठं काहीही नाही. जय हिंद.”
धवनसोबतच इरफान पठान, हरभजन सिंह, युसूफ पठान यांनीही पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला. भारत-पाकिस्तान लिजेंड्स सामना एक मोठा खेळीतम ठरणार होता, पण भारतीय माजी खेळाडूंच्या ठाम भूमिकेमुळे हा सामना रद्द करण्यात आला.





















