(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs NZ Head to Head : दोन्ही संघासाठी आज 'करो या मरो'चा सामना, कसा आहे दोन्ही संघाचा टी20 मधील आजवरचा इतिहास?
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने तर दुसरा भारताने जिंकल्यामुळे आजची लढत निर्णायक असणार आहे.
India vs New Zealand, T20 Record : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आज अहमदाबादमध्ये तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील (T20 Series) अखेरचा सामना खेळवला जाणार आहे. पहिला टी20 सामना न्यूझीलंडने 12 धावांनी जिंकला. तर दुसरा सामना भारतने 6 विकेट्सने जिंकत मालिकेत बरोबरी साधली. आज तिसरा आणि निर्णायक सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. आज सामना जिंकणारा संघ मालिकाही जिंकणार असल्याने दोघांसाठी आजचा सामना महत्त्वाचा असेल, तर या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचा आजवरचा एकमेंकाविरुद्धचा इतिहास जाणून घेऊ...
आजवरच्या इतिहासाचा विचार करता दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 24 टी-20 सामने झाले आहेत, ज्यामध्ये जवळपास बरोबरीची स्पर्धा झाली आहे. येथे भारताने 13 सामने जिंकले असून न्यूझीलंडने 10 सामने जिंकले आहेत. तसेच दोन्ही संघांमधील एक सामना अनिर्णीत देखील आहे. या सामन्यांचे निकाल पाहता येथे टीम इंडियाचा काहीसा वरचष्मा दिसत असला तरी आज एक रंगतदार सामना नक्कीच पाहायला मिळू शकतो. दरम्यान न्यूझीलंडचा संघ गेल्या 11 वर्षांपासून भारतीय भूमीवर टी-20 मालिका जिंकण्यात अपयशी ठरला आहे. 2012 मध्ये किवींनी शेवटची टी20 मालिका भारतीय भूमीवर जिंकली होती. न्यूझीलंडने दोन सामन्यांच्या मालिकेत भारताचा 1-0 असा पराभव केला. त्यानंतर जेव्हा-जेव्हा न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर टी-20 मालिका खेळायला आला, तेव्हा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 2017 मध्ये न्यूझीलंडने भारतीय भूमीवर तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळली, जी भारताने 2-1 ने जिंकली. 2021 च्या मालिकेत टीम इंडियाने किवींचा 3-0 असा पराभव केला होता.
दोन्ही संघासाठी 'करो या मरो'चा सामना
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना दोन्ही संघासाठी करो किंवा मरो असा असणार आहे. कारण भारत आणि न्यूझीलंड दोघांनी एक-एक सामना जिंकला आहे. सामना टीम इंडिया हा सामना हरली तर मालिका त्यांच्या हातून निघून जाईल. या मालिकेत किवी संघ 1-0 ने पुढे आहे. भारतीय संघाने गेल्या 10 वर्षांपासून घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध मालिका गमावलेला नाही. भारताने 2012 साली न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मैदानावर शेवटची टी-20 मालिका गमावली होती. त्यानंतर किवींनी दोन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचा 1-0 असा पराभव केला.
कधी, कुठे पाहू शकता आजचा सामना?
भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार Sony Liv अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
अशी असू शकते भारताची अंतिम 11सलामीवीर -शुभमन गिल, ईशान किशन
मिडिल ऑर्डर फलंदाज - पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी
ऑलराउंडर- हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर
गोलंदाज - कुलदीप यादव, शिवम मावी, अर्शदीप सिंह
हे देखील वाचा-