एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

World Cup 2023 : नॉकआऊट सामन्याआधी भारताची पूर्वतयारी, आज नेदरलँड्सची भिडणार 

नॉकआऊट सामन्याच्या पूर्वतयारीसाठी भारतीय संघाला एका सामन्यात खेळण्याची संधी मिळणार आहे. विश्वचषक साखळीतल्या या सामन्यात भारतासमोर नेदरलँड्सचं आव्हान आहे.

IND vs NED, World Cup 2023 : विश्वचषकाच्या रणांगणात भारतीय संघाचं उपांत्य फेरीचं तिकीट कन्फर्म झालंय. उपांत्य फेरीत भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणार, हेही पक्कं झालंय. पण त्या नॉकआऊट सामन्याच्या पूर्वतयारीसाठी भारतीय संघाला एका सामन्यात खेळण्याची संधी मिळणार आहे. विश्वचषक साखळीतल्या या सामन्यात भारतासमोर नेदरलँड्सचं आव्हान आहे. वन डे क्रिकेटच्या दुनियेत नेदरलँड्स हा कच्चा लिंबू मानला जात असला तरी याच संघानं दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशला हरवलंय, ते विसरता येणार नाही.

विश्वचषकाच्या रणांगणात भारताचा अखेरचा साखळी सामना आज नेदरलँड्सशी होतोय. हा सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येईल. भारतानं लागोपाठ आठ सामन्यांमध्ये विजय मिळवून विश्वचषकाच्या गुणतालिकेत अव्वल स्थान तर पटकावलंच, पण विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचं पहिलं तिकीटही कन्फर्म केलंय. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणारंय. पण त्या नॉकआऊट सामन्याआधी भारतीय संघाला आणखी एका साखळी सामन्यात खेळण्याची संधी मिळणार आहे. या सामन्यात भारतासमोर नेदरलँड्सचं आव्हान आहे. वन डे क्रिकेटच्या दुनियेत नेदरलँड्स हा कच्चा लिंबू मानला जात असला तरी विश्वचषकाच्या साखळीत याच संघानं दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशसारख्या बलाढ्य संघांना हरवलंय, ते विसरता येणार नाही. त्यामुळं आठ सामन्यांमध्ये त्या दोन विजयांसह नेदरलँड्स गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. पण त्याच नेदरलँडविरुद्ध सामन्याचा आपल्या उणीवा दूर करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न राहिल.

विश्वचषक 2023 मधील शेवटचा लीग सामना
आजचा सामना नेदरलँड्ससाठी महत्त्वाचा आहे. नेदरलँडचा संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतून बाहेर पडला असून त्यांच्यासाठी हा सामना 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरण्याचा शेवटचा मार्ग आहे. हा सामना जिंकल्यास नेदरलँड्स बांगलादेशला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मागे टाकू शकतो. तर, विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाने आधीच अंतिम-4 मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आजचा टीम इंडियासाठी उपांत्य फेरीचा सराव सामना असेल. 

भारताविरुद्ध सामना जिकणं नेदरलँड्ससाठी गरजेचं
विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तान व्यतिरिक्त टॉप-7 संघांना चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळण्याची संधी मिळेल. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं यजमानपदाचा पाकिस्तानकडे असल्याने त्यांनी आधीच या स्पर्धेत प्रवेश केला आहे. सध्या पॉइंट टेबलमध्ये नेदरलँड्स शेवटच्या स्थानावर आहे. त्यामुळे संघाला आजचा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावाच लागेल. 

प्रसिद्ध कृष्णा वर्ल्डकपमध्ये पदारप्ण करणार ?
भारतीय संघ उपांत्य फेरीपूर्वी कोणताही प्रयोग करणार नसल्याचं, प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. पण, या सामन्याकडे उपांत्य फेरीचा सराव सामना म्हणून पाहिल्यास काही खेळाडूंना विश्रांती देण्याची शक्यता आहे.. टीम इंडिया आज जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांना विश्रांती देऊ शकते आणि प्लेइंग-11 मध्ये प्रसिद्ध कृष्णा आणि आर अश्विनला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव/आर अश्विन, जसप्रीत बुमराह/प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

नेदरलँड्सचा संभाव्य प्लेइंग-11 
मॅक्स ओ'डॉड, वेस्ली बरासी, कॉलिन एकरमन, सिब्रांड एंजेलब्रेक्ट, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), बास डी लीडे, तेजा नदामानुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mitkari On Naresh Arora : अरोरांनी अजितदादांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढल्यानं कार्यकर्ते नाराजRamdas Athwale On Fadanvis : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री बनतील, शिंदेंना कोणतंच आश्वासन दिलं नव्हतंABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 26 November 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स-Sunil Bhusara Mumbai : मला मिळायला हवी ती मतं विरोधी उमेदवाराला मिळाली - सुनील भुसारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा; खटाखट निर्णय घेणाऱ्या शिदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं
Nashik Crime : आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Embed widget