एक्स्प्लोर

India vs Ireland T20I : बुमराहचं कमबॅक, रिंकूचं पदार्पण, 'या' पाच खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा

India vs Ireland T20I ; आजपासून भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्याच्या टी 20 मालिकेला सुरुवात होत आहे.

India vs Ireland T20I Series : आजपासून भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्याच्या टी 20 मालिकेला सुरुवात होत आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वातील युवा भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. सात वाजता नाणेफेक होणार आहे. भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असतील. फिनिशर रिंकू सिंह याचे पदार्पण होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय कमबॅक करणारा जसप्रीत बुमराह कशी गोलंदाजी करतो? याकडेही क्रीडा चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. आयर्लंडकडूनही प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता आहे. आयर्लंडच्या संघात अनुभवी खेळाडूंचा भरणार आहे. टी 20 क्रिकेटमध्ये आयर्लंडमध्येचे रेकॉर्ड चांगले आहे. दोन्ही संघामध्ये आतापर्यत पाच टी20 सामने झाले आहेत. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवलाय. पण आयर्लंडकडून प्रतिक्रार पाहायला मिळाला होता. त्यामुळे आयर्लंडला कमी लेखण्याची चूक बुमराह करणार नाही. आजच्या सामन्यात पाच खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा आहेत. पाहूयात कोण आहेत, ते खेळाडू 

1 – जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराहने वर्षभरानंतर भारतीय संघात पुनरागमन केलेय. आशिया चषक आणि विश्वचषकाच्या दृष्टीने बुमराहची कामगिरी भारतीय संघासाठी महत्वाची आहे. आज बुरराह कशी कामगिरी करतो, याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. बुमराह भारतीय संघाची धुराही सांभाळत आहे. त्यामुळे पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन करणाऱ्या बुमराहच्या फिटनेसवर सर्वांच्या नजरा असतील. अशा स्थितीत तो मैदानावर कोणत्या वेगाने गोलंदाजी करतो हेही महत्त्वाचे ठरणार आहे. 

2 – पॉल स्टर्लिंग

आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंग याच्या कामगिरीकडे क्रीडा चाहत्यांच्या नजरा आहे. पॉल स्टर्लिंग याने भारताविरोधात आतापर्यंत चार सामने खेळलेत, पण त्याला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. स्टर्लिंग याने चार टी 20 सामन्यात फक्त 11.25 च्या सरासरीने फक्त 45 धावा केल्या आहेत. 40 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. टी 20 क्रिकेटमध्ये पॉल स्टर्लिंग याचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात स्टर्लिंग याच्याकडून मोठ्या खेळीची आपेक्षा आहे. 

3 – रिंकू सिंह

रिंकू सिंह याचे आज पदार्पण होण्याची शक्यता आहे. रिंकू सिंह याने आयपीएलमध्ये सलग पाच षटकार ठोकून सर्वांचे लक्ष वेधले होते. आयर्लंड दौऱ्यात रिंकू सिंह कशी कामगिरी करतो, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. आयपीएलच्या 16 व्या हंगामात रिंकू याने धावांचा पाऊस पाडला होता. आज संधी मिळाल्यास रिंकू कशी कामगिरी करतो हे पाहावे लागेल. 

4 – तिलक वर्मा

तिलक वर्माने वेस्ट इंडिजविरोधातील टी 20 मालिकेत दमदार कामगिरी केली होती. लितक वर्मा याने दणक्यात पदार्पण करत टीम इंडियातील जागा निश्चित केली आहे.  स्विंग गोलंदाजीसमोर तिलक कशी फलंदाजी करतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. आयर्लंडविरोधात तिलक वर्माने दमदार प्रदर्शन केल्यास टीम इंडियातील त्याचे स्थान निश्चित मानले जातेय. 

5 – हॅरी टेक्टर

20 वर्षीय हॅरी टेक्टर याने मागील काही दिवसांत दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधलेय. गतवर्षी भारताविरोधात त्याने दोन सामन्यात नाबाद 64 आणि 39 धावांची शानदार खेली केली होती. यंदाच्या मालिकेत हॅरीच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असतील. हॅरी याने आतापर्यंत 62 टी 20 सामन्यात 23 च्या सरासरीने 1029 धावा केल्या आहेत. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray interview :…म्हणून राज ठाकरेंसोबत युती नाही!   उद्धव ठाकरेंची बेधडक मुलाखतPriyanka Gandhi SpeechKolhapur|बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला,कोल्हापुरातील आक्रमक भाषणDilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसेPriyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
×
Embed widget