(Source: Poll of Polls)
India Vs England: राहुल द्रविडच्या नेतृत्वात इंग्लंडमध्ये फडकलाय भारताचा तिरंगा, आता प्रशिक्षक म्हणून इतिहास रचणार?
India tour of England: इंग्लंडमध्ये इतिहास रचण्यापासून भारतीय क्रिकेट संघ एक विजय दूर आहेत.
India tour of England: इंग्लंडमध्ये इतिहास रचण्यापासून भारतीय क्रिकेट संघ एक विजय दूर आहेत. भारतीय संघ गेल्या वर्षी पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. या मालिकेतील भारत 2-1 नं आघाडीवर आहे. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या मालिकेतील अखेरचा सामना पुढे ढकलण्यात आला होता. हाच सामना खेळण्यासाठी भारतीय संघ पुन्हा इंग्लड दौऱ्यावर गेलाय. येत्या 1 जुलैपासून एजबॅस्टन येथे हा सामना खेळला जाणार आहे. या दौऱ्यात भारताचा प्रशिक्षक राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) मार्गदर्शनाखाली भारतीय संघ इतिहास रचणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडला इंग्लंडमध्ये इतिहास रचण्याची संधी
राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली 2007 मध्ये इंग्लडं दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघानं मालिका 1-0 नं जिंकली होती. त्यानंतर भारताला इंग्लंडमध्ये कोणतीही कसोटी मालिका जिंकता आली नाही. राहुल द्रविड सध्या भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी संभाळत आहेत. तसेच प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडला इंग्लंडमध्ये मालिका जिंकण्याची मोठी संधी आहे.
इंग्लंडमध्ये भारताची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी (2007 पासून)
वर्ष | निकाल |
2007 | भारतानं 1-0 नं मालिका जिंकली |
2011 | भारतानं 4-0 नं मालिका गमावली |
2018 | भारतानं 4-1 नं मालिका गमावली |
2021-22 | भारत मालिकेत 2-0 नं आघाडीवर |
15 वर्षापूर्वी भारतानं इंग्लंडमध्ये जिंकलीय कसोटी मालिका
दरम्यान, 2007 मध्ये तीन सामन्याची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित ठरल्यानंतर भारतानं दुसऱ्या सामन्यात यजमान इंग्लंडला नमवलं. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारतासमोर इंग्लंडचं मोठं आव्हान होतं. परंतु, तिसरा कसोटी सामनाही अनिर्णित ठरल्यानं भारतानं 1-0 नं फरकानं मालिकेवर नाव कोरलं.
हे देखील वाचा-