Virat Kohli : साहेबांविरोधात विराट कोहलीचा शानदार रिकॉर्ड, भारताकडून सर्वाधिक धावा कुणाच्या नावावर ?
Virat Kohli IND vs ENG: रनमशीन विराट कोहलीने इंग्लंडविरोधात खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. आजही त्याच्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा असेल.
Virat Kohli, India vs England : विश्वचषकात आज भारत आणि गतविजेत्या इंग्लंडमध्ये आमना-सामना होणार आहे. लखनौच्या इकना स्टेडिअममध्ये दोन्ही संघामध्ये होणारी लढत रोमांचक होईल, असा अंदाज आहे. भारतीय संघ स्पर्धेत अजय आहे, तर दुसरीकडे इंग्लंडला फक्त एका सामन्यात विजय मिळवता आलाय. स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी इंग्लंडला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. पण भन्नाट फॉर्मात असणाऱ्या टीम इंडियाला हरवणं इंग्लंडसाठी सोपं नसेल. भारताचा अनुभवी खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा फॉर्ममध्ये आहेत. विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील रेकॉर्डसवर नजर मारल्यास विराट कोहलीने खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. इंग्लंडविरोधात विराट कोहलीची बॅट नेहमीच तळपली आहे. सध्या खेळत असलेल्या खेळाडूमध्ये इंग्लंडविरोधात विराट कोहलीने सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. ओव्हरऑल इंग्लंडविरोधात सर्वाधिक धावा धोनीने काढल्या आहेत.
विराट कोहली सध्या फॉर्ममध्ये आहे. विराट कोहलीने तीन अर्धशतके आणि एक शतक ठोकत भारताकडून विश्वचषकात सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. इंग्लंडविरोधात विराट कोहलीने नेहमीच खोऱ्याने धावा काढतो. सध्या खेळत असलेल्या भारतीय संघामध्ये इंग्लंडविरोधात सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या नावावर आहेत. विराट कोहलीने इंग्लंडविरोधात 35 सामन्यात 1340 धावा केल्या आहेत. यामध्ये तीन शतके आणि 9 अर्धशतके ठोकली आहेत. यादरम्यान विराट कोहलीने 127 चौकारही ठोकले आहेत. इंग्लंडविरोधात विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या 122 इतकी आहे. आता विश्वचषकात विराट पुन्हा एकदा इंग्लंडच्या गोलंदाजांची कुटाई करेल.
इंग्लंडविरोधात भारताकडून सर्वाधिक धावांचा विक्रम माजी कर्णधार एमएस धोनीच्या नावावर आहे. धोनीने 48 सामन्यात 1546 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. या यादीत युवराज दुसऱ्या स्थानावर आहे. युवराजने 37 सामन्यात 1523 धावा केल्या आहेत. यामध्ये चार शतके आणि सात अर्धशतके आहेत. सचिन तेंडुलकर तिसऱ्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरने 37 सामन्यात 1455 धावा केल्या आहेत. यामध्ये तीन शतके आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे.
गोलंदाजीत जाडेजा अव्वल -
गोलंदाजीत रविंद्र जाडेजा पहिल्या क्रमांकावर आहे. जाडेजाने 25 सामन्यात 38 विकेट घेतल्या आहेत. या यादीत हरभजन सिंह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भज्जीने 23 सामन्यात 36 विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर अश्विन आहे.
भारताची संभाव्य प्लेईंग 11 -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रविंद्र जाडेजा, सूर्यकुमार यादव/ईशान किशन, अश्विन/सिराज, मोहम्मद शामी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव