एक्स्प्लोर

INDvsENG 1st test: टीम इंडियाचा 227 धावांनी पराभव, इंग्लंडची मालिकेत 1-0 ने आघाडी

चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. चौथ्या डावात टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांची आवश्यकता होती.

INDvsENG 1st test:  पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाविरुद्ध दणदणीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाचा 227 धावांनी पराभव झाला आहे, चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. चौथ्या डावात टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांची आवश्यकता होती. मात्र भारतीय संघ 192 धावांवपर्यंत मजल मारु शकला.

चेन्नई कसोटीत लाजिरवाना पराभव पत्करावा लागला आहे. भारताने पहिला कसोटी सामना 227 धावांनी गमावला. 420 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ 192 धावांवर बाद झाला. कर्णधार कोहलीने भारताकडून सर्वाधिक 72 धावा केल्या. शुभमन गिल 50 धावा केल्या. इंग्लंडकडून जॅक लीचने 4, जेम्स अँडरसनने 3, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि डॉम बाईसने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

अश्विनची कमाल गोलंदाजी

पहिल्या डावात 578 धावांचा डोंगर उभारणाऱ्या इंग्लंडला दुसऱ्या डावात रोखण्यात टीम इंडियाला यश आलं होतं. मात्र अश्विनच्या गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडच्या संघाला टीम इंडियाने 178 धावांवर रोखलं. अश्विननं रोरी बर्न्स, डॉमनिक सिब्ले, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि जेम्स अँडरसन यांना बाद केलं. कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीत त्यानं 28व्या वेळेस पाचपेक्षाही जास्त गडी बाद करण्याची कमाल केली. शिवाय कसोटी क्रिकेटच्या एकाच डावात सर्वाधिक पाच गडी बाद करणारा तो जगातील आठवा गोलंदाज ठरला आहे.

अश्विनची ऐतिहासिक कामगिरी; 'हा' विक्रम करणारा 100 वर्षातील एकमेव फिरकीपटू

पहिल्या दिवसापासून इंग्लंंडची सामन्यावर पकड

चेन्नई कसोटीच्या पहिल्याच दिवसापासून इंग्लंडने सामन्यावर आपली पकड कायम ठेवली. नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार जो रूटच्या 218 धावांच्या मोबदल्यात इंग्लंडने पहिल्या डावात 578 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताचा संघ 337 धावांवर आटोपला. भारताकडून पंतने सर्वाधिक 91 धावांची खेळी केली. पहिल्या डावात इंग्लंडकडून डॉम बाईस चार विकेट्स घेतल्या. दुसर्‍या डावात इंग्लंडचा डाव 178 धावांवर आटोपला. पहिल्या डावात इंग्लंडला 241 धावांची आघाडी होती. त्यामुळे भारताला विजयासाठी 420 धावांचे मोठे आव्हान मिळाले. शेवटच्या दिवशी टी ब्रेक होण्यापूर्वी भारताचा संघ 192 धावांवर बाद झाला. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयासह इंग्लंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याची आशा कायम ठेवली आहे.

भारतीय गोलंदाजांची निराशाजनक कामगिरी, नकोसा रेकॉर्ड केला नावे

चेन्नईत 1999 पहिलाच पराभव

भारताचा 1999 नंतर पहिल्यांदाच चेन्नईत पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाने भारतात 2017 पासून कोणताही कसोटी सामना गमावला नव्हता. पण इंग्लंडने सर्व समीकरणे बदलली आणि मोठा विजय मिळवला. भारताच्या फिरकीपटूंना उपयुक्त अशा खेळपट्टीवर भारताचा पराभव करणे हे इंग्लंडचं मोठं यश आहे.

संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :   8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सBatenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मल्टीकलर साडी, ऑफ शोल्डर ब्लाऊज; जान्हवीच्या क्लासी अदा, म्हणाली,
मल्टीकलर साडी, ऑफ शोल्डर ब्लाऊज; जान्हवीच्या क्लासी अदा, म्हणाली, "कसाटा खाण्याची इच्छा होती, तर..."
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Embed widget