India vs England, Chepauk Test: जो रुटची शानदार खेळी; बिग बींच्या पाच वर्षापूर्वीच्या ट्वीटला अँड्र्यू फ्लिंटॉफचं उत्तर
इंग्लंडचा संघ 2016 साली भारत दौऱ्यावर आला होता त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी जो रुटच्या खेळीवर प्रश्न उपस्थित केले होते. अमिताभ बच्चन यांनी लिहिले होते, जो रु कौन हैं? उसको तो हम जड़ से उखाड़ देंगे.
IND Vs ENG: चेन्नईत सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडची धावसंख्या 600 च्या दिशेने वाटचाल करत आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी इंग्लंडकडून भारतीय खेळपट्ट्यांवर अशा शानदार फलंदाजीची कोणालाही अपेक्षा नव्हती. पण जो रूटच्या द्विशतकामुळे इंग्लंडचा माजी अष्टपैलू अँड्र्यू फ्लिंटॉफला बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना लक्ष्य करण्याची संधी मिळाली.
इंग्लंडचा संघ 2016 साली भारत दौऱ्यावर आला होता त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी जो रुटच्या खेळीवर प्रश्न उपस्थित केले होते. अमिताभ बच्चन यांनी लिहिले होते, जो रु कौन हैं? उसको तो हम जड़ से उखाड़ देंगे (जो रुटला आम्ही मुळापासून उपटून टाकू.)
अँड्र्यू फ्लिंटॉफने अमिताभ बच्चन यांचं हे ट्वीट रिट्वीट केलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या पाच वर्षापूर्वीच्या ट्वीटला उत्तर देतांना फ्लिंटॉफने लिहिलं की, बघा त्याने किती उत्कृष्ट खेळी केली.
With the greatest respect , this aged well ???? https://t.co/sjhs7HGT1d
— Andrew Flintoff (@flintoff11) February 6, 2021
जो रूट जबरदस्त फॉर्ममध्ये
2016 मध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेत इंग्लंडची कामगिरी खूप निराशाजनक होती. त्या मालिकेत भारताने इंग्लंडला 4-0 असा व्हाईटवॉश दिला होता. जो रूटसुद्धा त्या मालिकेत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करण्यात अपयशी ठरला होता. परंतु 2021 मध्ये चित्र बरेच बदलले आहे. गेल्या तीन कसोटी सामन्यात रुटने सलग तीन शतकं ठोकली आहेत, ज्यात दोन द्विशतकं आहेत. यावर्षी तीन कसोटी सामन्यात रूटने 600 हून अधिक धावा केल्या आहेत. जो रूटने भारताविरुद्ध 218 धावांची खेळी करुन अनेक बरीच विक्रम आपल्या नावे केले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 150 हून अधिक धावा करण्याची रुटची दहावी वेळ आहे.
संबंधित बातम्या