एक्स्प्लोर

IND vs ENG : यशस्वी भव! भारताचा विजय जवळपास निश्चित,  इंग्लंडपुढे 557 धावांचे 'विराट' आव्हान

India vs England 3rd Test Day 4 :  राजकोट कसोटीत भारताचा विजय जवळपास निश्चित झालाय. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघानं दुसरा डाव  4 बाद 430 धावांवर घोषीत केलाय. इंग्लंडला विजयासाठी भारताने तब्बल 557 धावांचे विराट आव्हान दिलेय.

India vs England 3rd Test Day 4:  राजकोट कसोटीत भारताचा विजय जवळपास निश्चित झालाय. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघानं दुसरा डाव  4 बाद 430 धावांवर घोषीत केलाय. इंग्लंडला विजयासाठी भारताने तब्बल 557 धावांचे विराट आव्हान दिलेय. पहिल्या डावात भारताकडे 126 धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात भारताकडून यशस्वी जायस्वाल यानं द्विशतकी खेळी केली. तर सरफराज खान आणि शुभमन गिल यांनी तडाखेबाद अर्धशतकं ठोकली. युवा यशस्वी जायस्वाल यानं अनुभवी जेम्स अँडरसनची पिसे काढली. 

यशस्वी जायस्वालचं सलग दुसरं द्विशतक - 

अवघी सातवी कसोटी खेळणाऱ्या 21 वर्षीय यशस्वी जायस्वाल यानं सलग दुसरं द्विशतक ठोकलं. यशस्वी जायस्वाल यानं पहिल्या चेंडूपासूनच इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. मार्क वूड आणि जेम्स अँडरसन यासारखे अनुभव गोलंदाजही यशस्वी जायस्वालसमोर फिके पडले. राजकोट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी यशस्वी जायस्वाल यानं शानदार शतक ठोकल. पण दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावं लागलं. पण चौथ्या दिवशी पुन्हा तो मैदानावर परतला. जिथे खेळ सोडला तेथूनच त्यानं सुरुवात केली. त्यानं गोलंदाज कोण आहे ? याचा विचार केला नाही फक्त चेंडू फटकावलं. यशस्वी जायस्वाल यानं 236 चेंडूत 214 धावांची खेळी करत माघारी परतला. यशस्वीनं आपल्या या खेळीमध्ये 12 षटकार आणि 14 चौकार ठोकले. एकाच डावात सर्वाधिक षटकार लगावण्याचाही विक्रम यशस्वीच्या नावावर झाला आहे. 

शुभमन गिलची शानदार खेळी - 

तिसऱ्या दिवशी भारत दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला. पण कर्णधार रोहित शर्मा 19 धावांवर माघारी परतला. त्यानंतर आलेल्या शुभमन गिल यानं संयमी फलंदाजी केली. शुभमन गिल यानं यशस्वी जायस्वाल याला चांगली साथ दिली. शुभमन गिल यानं 91 धावांची खेळी केली. तो शतक करेल असे वाटलं होतं, पण दुर्दैवीरित्या धावबाद झाला. शुभमन गिल यानं 151 चेंडूमध्ये  2 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 91 धावा जोडल्या. 

सरफराजचीही धमाकेदार फलंदाजी - 

सरफराज खान यानेही मिळालेल्या संधीचं सोनं केले. सरफराज खान यानं राजकोट कसोटीच्या दुसऱ्या डावातही अर्धशतक ठोकलं. सरफराज खान यानं वनडे स्टाईल फटकेबाजी केली. सरफराज खान यानं 72 चेंडूमध्ये 68 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये 6 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. सरफराज खान याने चौफेर फटकेबाजी करत यशस्वी जायस्वाल याला साध दिली. 

पहिल्या डावात भारताकडे 126 धावांची आघाडी - 

भारताने पहिल्या डावात 445 धावांपर्यंत मजल मारली होती. रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजा यांच्या शतकाच्या बळावर भारताने 445 धावांपर्यंत मजल मारली होती. या धावांचा बचाव करताना भारताच्या गोलंदाजांनी इंग्लंडला 319 धावांत गुंडाळलं. मोहम्मद सिराज यानं चार फलंदाजांना तंबूत धाडलं. पहिल्या डावात भारताने 126 धावांची आघाडी घेतली. 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
Ind vs Sl 1st Test : पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
WTC Points Table : श्रीलंकेला हरवलं, 12 गुण कमावले… तरीही टीम इंडिया एकाच जागेवर; WTC रँकिंगमध्ये आला असा ट्विस्ट की सगळेच हैराण!
श्रीलंकेला हरवलं, 12 गुण कमावले… तरीही टीम इंडिया एकाच जागेवर; WTC रँकिंगमध्ये आला असा ट्विस्ट की सगळेच हैराण!
IND vs SL 1st Test : लंकेत टीम इंडियाचे शक्तीप्रदर्शन! पहिल्या कसोटीत घरात घुसून 165 धावांनी श्रीलंकेचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी
लंकेत टीम इंडियाचे शक्तीप्रदर्शन! पहिल्या कसोटीत घरात घुसून 165 धावांनी श्रीलंकेचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Embed widget