India vs England ODI Series | भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक
एकदिवसीय मालिकेचे सर्व सामने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे खेळले जातील. एकदिवसीय मालिकेतील सर्व सामने दुपारी दीड वाजता सुरू होतील.
INDIA vs ENGLAND : इंग्लंड विरुद्धच्या कसोटी आणि टी -20 मालिका विजयानंतर आता टीम इंडियाचं लक्ष एकदिवसीय मालिकेवर असणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 23 मार्चपासून दोन्ही संघांमध्ये खेळली जाईल. या मालिकेतील सर्व सामने डे-नाईट असतील. या मालिकेसाठी भारताने 18 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. परंतु इंग्लंडने अद्याप त्यांच्या संघाची घोषणा केलेली नाही.
एकदिवसीय मालिकेत प्रेक्षकांची उपस्थिती नसणार
महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे वनडे मालिका रिकाम्या स्टेडियममध्येच खेळली जाईल. महाराष्ट्रात पुन्हा कोरोना संक्रमण वाढल्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. एकदिवसीय मालिकेचे सर्व सामने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे खेळले जातील. एकदिवसीय मालिकेतील सर्व सामने दुपारी दीड वाजता सुरू होतील.
वनडे मालिकेसाठी टीम इंडिया
इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. या संघात सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा, क्रुणाल पांड्या, मोहम्मद सिराज, टी नटराजन, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, ऋषभ पंत आणि शुभमन गिल अशा अनेक युवा खेळाडूंना स्थान मिळाले आहे. मात्र, या संघात विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार यांच्या रूपात काही सिनियर खेळाडूही आहेत.
IND vs ENG 5th T-20 : टीम इंडियाचा सलग सहावा मालिका विजय; पाचव्या टी-20 सामन्यात झालेले विक्रम
भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, क्रुणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर.
एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
- पहिला वनडे - 23 मार्च (पुणे)
- दुसरा वनडे - 26 मार्च (पुणे)
- तिसरा वनडे - 28 मार्च (पुणे)