एक्स्प्लोर

India vs Australia 2nd T20 LIVE | भारताचा दुसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्स राखून विजय. टी20 मालिकेत भारताची 2-0 अशी आघाडी.

India vs Australia 2nd T20 LIVE : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरा टी20 सामना खेळवण्यात येत आहे.

India vs Australia 2nd T20 LIVE UPDATES ind vs aus 2nd t20 Australia vs India live score India vs Australia 2nd T20 LIVE | भारताचा दुसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्स राखून विजय. टी20 मालिकेत भारताची 2-0 अशी आघाडी.

Background

India vs Australia 2nd T20 LIVE | एकदिवसीय सामन्यांच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 1-2 असा पराभव झाल्यानंतर टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात 11 धावांनी विजय मिळवला. रविवारी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर दोन्ही संघांमध्ये दुसरा टी20 सामना खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियासमोर दुसरा सामना जिंकत एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. परंतु, ऑस्ट्रेलियासाठी दुसऱ्या टी20 सामन्यात वापसी करणं अवघड असणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात दुखापतींचं सत्र सुरुच असून अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत.

डेव्हिड वॉर्नर आधीपासून सीरिजमधून बाहेर आहे. कर्णधार एरॉन फिंचलाही पहिल्या टी20 सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात फिंच खेळणार की नाही, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. जर दुसऱ्या टी20 सामन्यांत फिंच खेळला नाही तर हा यजमान संघासाठी मोठा धक्का असणार आहे. जर फिंच आजच्या सामन्यात गैरहजर राहिला तर संघासाठी धावांचा डोंगर रचण्याची जबाबदारी स्टीव्ह स्मिथवर असणार आहे.

पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी विकेट गमावले होते. या सामन्यात यजमान संघ पहिल्या सामन्यातील चुका सुधारण्याचा प्रयत्न करतील. गोलंदाजीमध्ये शेवटच्या काही ओव्हर्समध्ये गोलंदाजांनी फारसं चांगलं प्रदर्शन केलं नाही. अशातच शेवटच्या ओव्हर्समध्ये टीम इंडियासाठी धावा काढणारा भारताचा स्टार खेळाडू रविंद्र जाडेजा दुखापतग्रस्त झाल्यामुळे आजच्या सामन्यात सहभागी होऊ शकणार नाही, ही ऑस्ट्रेलियासाठी दिलासादायक बाब ठरू शकते.

चहलला मिळू शकते संधी

रवींद्र जाडेजा संघाबाहेर असणं टीम इंडियासाठी अत्यंत चिंतेची बाब आहे. शिखर धवनसोबत मैदानावर उतरलेला लोकेश राहुल आणि रवींद्र जाडेजा यांच्या धमाकेदार खेळीमुळेच टीम इंडिया पहिल्या टी20 सामन्यात 161 धावा करू शकली.

पहिल्या टी20 सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली देखील फारशी चांगली खेळू करू शकला नव्हता. जाडेजाच्या जागी कनकशन सब्सीटियूट म्हणून युजवेंद्र चहलचा संघात समावेश करण्यात आला आहे. चहलने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंना माघारी धाडलं होतं. परंतु, त्यावेळी चहलचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला नव्हता. अशातच आज चहलला संघात प्राथमिकता देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

चहल व्यतिरिक्त टी. नटराजननेही धमाकेदार खेळी केली होती. कोहलीने पहिल्या टी20 मध्ये जसप्रीत बुमराहला संघाबाहेर ठेवलं होतं. दुसऱ्या सामन्यात बुमराहची वापसी होण्याची शक्यता आहे.

संभाव्य संघ :

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, लोकेश राहुल (उपकर्णधार, विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दूल ठाकूर, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सॅनी, दीपक चहर, टी.नटराजन.

आस्ट्रेलिया : एरॉन फिंच (कर्णधार), सीन एबॉट, एश्टन एगर, एलेक्स कैरी, पैट कमिंस (उपकर्णधार), नाथन लॉयन, जोश हेजलवुड, मोइजेज हेनरिक्स, मार्नस लाबुशॅन, ग्लेन मॅक्सवेल, डेनियल सॅम्स, एंड्रयू टाई, स्टीव स्मिथ, मैथ्यू वेड, मिशेल स्टार्क, एडम जाम्पा.

17:30 PM (IST)  •  06 Dec 2020

भारताचा दुसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्स राखून विजय. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 195 धावांचं लक्ष ठेवलं होतं. भारतानं ते 4 विकेट्सच्या बदल्यात पार केलं. या सामन्यासोबत भारतानं टी20 मालिकाही जिंकली. टी20 मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या वतीनं विराट कोहली आणि हार्दिक पांड्याची खेळी निर्णायक ठरली.
17:27 PM (IST)  •  06 Dec 2020

भारताचा दुसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्स राखून विजय. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 195 धावांचं लक्ष ठेवलं होतं. भारतानं ते 4 विकेट्सच्या बदल्यात पार केलं.
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Embed widget