IND vs ZIM: भारत-झिम्बाब्वे यांच्यातील एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात; पाहा दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्ड
IND vs ZIM, 1st T20, Head to Head Record: भारतीय संघ झिम्बाब्वे (India Tour Of Zimbabwe) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे.
IND vs ZIM 1st T20, Head to Head Record: भारतीय संघ झिम्बाब्वे (India Tour Of Zimbabwe) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज (18 ऑगस्ट 2022) हरारे स्पोर्ट्स क्लब (Harare Sports Club) येथे खेळवला जाणार आहे. महत्वाचं म्हणजे, तब्बल सहा वर्षानंतर भारतीय संघ झिम्बाब्वेचा दौऱ्यावर गेलाय. यापूर्वी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात 2016 मध्ये भारतानं झिम्बॉवे दौरा केला होता. त्यावेळी भारतानं झिम्बॉवेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तितक्याच सामन्यांची टी-20 मालिका खेळली होती.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील एकदिवसीय मालिका रोमांचक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आपपल्या मागच्या मालिकेत विजय मिळवल्यानं दोन्ही संघाचा आत्मविश्वास वाढलाय. भारतानं इग्लंड (2-1) आणि वेस्ट इंडीजच्या संघाला (3-0) त्यांच्याच मायभूमीत नमवलं आहे. तर, झिम्बाब्वेच्या संघानं त्यांच्या मायभूमीवर बांग्लादेशचा विरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 मालिका जिंकलीय. झिम्बाब्वेनं तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत बांग्लादेशचा 2-1 असा आणि तितक्याच सामन्यांच्या टी-20 मालिकेतही 2-1 असा विजय मिळवलाय.
भारत-झिम्बाब्वे यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आतापर्यंत 63 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी 51 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, झिम्बाब्वेनं 10 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघातील दोन एकदिवसीय सामने अनिर्णित ठरले आहेत. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पहिला एकदिवसीय सामना 1983 मध्ये खेळण्यात आला होता. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आतापर्यंत आठ द्विपक्षीय मालिका खेळल्या गेल्या आहेत. यातील सात मालिकेत भारतानं विजय मिळवलाय. तर, एक मालिका झिब्बाब्वेनं जिंकली आहे. झिम्बाब्वेने 1996-97 मध्ये भारताविरुद्ध खेळण्यात आलेल्या दोन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 असा विजय मिळवला होता. या मालिकेतील पहिला सामना झिम्बाब्वे आठ विकेट्सनं जिकंला होता. तर, दुसरा सामना रद्द झाला होता.
संघ-
भारताचा संघ:
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शाहबाझ अहमद.
झिम्बाब्वेचा संघ:
रेगीस चकाब्वा (कर्णधार), रायन बुर्ल, तनाका चिवांगा, ब्रॅडली इवांस, ल्यूक जाँगवे, इनोसंट काया, ताकूदझ्वँनशी केईतानो, क्लाईव्ह मडांडे (यष्टीरक्षक), वेस्ली मॅदवेर, तदीवांशे मरुमानी, जॉन मसारा, टोनी मुनयोंगो, रिचर्ड येनगारावा, व्हिक्टर एनवायुची, सिकंदर रझा, मिल्टन शुम्बा, डोनाल्ड तिरीपानो.
हे देखील वाचा-