KKR New Head Coach: चंद्रकांत पंडीत यांच्यावर केकेआरच्या मुख्यप्रशिक्षकपदाची जबाबदारी!
KKR New Head Coach: आयपीएलच्या पुढच्या म्हणजेच सोळाव्या (IPL 2022) हंगामासाठी सर्वच संघानी जोरदार तयारी सुरू केलीय.
KKR New Head Coach: आयपीएलच्या पुढच्या म्हणजेच सोळाव्या (IPL 2022) हंगामासाठी सर्वच संघानी जोरदार तयारी सुरू केलीय. यातच दोन वेळा आयपीएलचा खिताब जिंकणाऱ्या कोलकात नाईट रायडर्सनं (Kolkata knights Riders) चंद्रकांत पंडीत (Chandrakanth Pandit) यांची मुख्यप्रशिक्षक म्हणून नियुक्ती केलीय. अनेक देशांतर्गत संघांसह यशस्वी प्रशिक्षक कारकीर्द केलेल्या पंडित यांनी अलीकडेच पहिले रणजी विजेतेपद जिंकणाऱ्या मध्य प्रदेश संघाचे प्रशिक्षकपद भूषवलं. पंडीत हे न्यूझीलंडचा दिग्गज क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्युलमची जागा घेणार आहे. मॅक्युलमने आयपीएल 2022 नंतर संघातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. महत्वाचं म्हणजे, अनुभवी प्रशिक्षक असूनही चंद्रकांत यांनी यापूर्वी कधीही कोणत्याही आयपीएल फ्रँचायझीसोबत काम केलं नाही.
केकेआरच्या मुख्यप्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारताच चंद्रकांत म्हणाले की, "झी कोलकात्याच्या मुख्यप्रशिक्षकपदी जबाबदारी ही माझ्यासाठी मोठा सन्मान सौभाग्यची गोष्ट आहे. मी कोलकाता नाईट रायडर्सशी जुडीत अन्य खेळाडू आणि अन्य लोकांच्या संस्कृतीबाबत ऐकलं आहे. सेटअपचा भाग असलेल्या सपोर्ट स्टाफ आणि खेळाडूंच्या गुणवत्तेबद्दल मी उत्साहित आहे आणि मी नम्रतेनं आणि सकारात्मक अपेक्षांसह या संधीची वाट पाहत आहे."
मुख्यप्रशिक्षक म्हणून चंद्रकांत पंडीत यांचं रणजी ट्रॉफीतील कामगिरी
चंद्रकांतच्या यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईनं तीन वेळा रणजी ट्रॉफी जिंकली आहे. याशिवाय, विदर्भानं सलग दोन वेळा, आणि मध्य प्रदेशनं एक वेळा रणजी ट्रॉफी जिंकली आहे. यावर्षी पार पडलेल्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात उत्तर प्रदेशच्या संघानं मुंबईचा पराभव करत पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीचा खितांब जिंकला. महत्वाचं म्हणजे, 2014 नंतर कोलकाताच्या संघाला आयपीएलची ट्रॉफी जिंकता आली नाही. मात्र, चंद्रकांत पंडीत यांची कोलकाताच्या मुख्यप्रशिक्षकपदी निवड झाल्यानं मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
कोलकात्याचे सीईओ काय म्हणाले?
चंद्रकांत पंडीत यांची कोलकाताच्या मुख्यप्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर केकेआरचे सीईओ व्हेंकी म्हैसूर म्हणाले की, "यपीएलच्या सोळाव्या हंगामात चंद्रकांत पडीत कोलकाताच्या संघाची मोठी जबाबदारी संभाळतील. त्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये कशाप्रकारे ठसा उमटवला? हे आपण पाहिलंच आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोलकात्याचा संघ चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे."
हे देखील वाचा-
- Aurangabad Crime: युट्यूबरने आधी प्रेयसीचा गळा चिरला, त्यानंतर मृतदेहाचे तुकडे घेऊन पोलिसात पोहचला
- Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ, 215 कोटींच्या खंडणीप्रकरणी आरोपपत्र दाखल
- Crime News : आधी घटस्फोटासाठी अर्ज, मग प्रेमाच्या आणाभाका; त्यानंतर कोर्टातच चिरला पत्नीचा गळा, पतीच्या कृत्यानं सारेच हादरले