WI vs IND: एकदिवसीय मालिकेत रोहित, विराटसह वरीष्ठ खेळाडूंना विश्रांती; टी-20 मालिकेत खेळणार का?
India Tour Of West Indies: इंग्लंडविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळल्यानंतर भारतीय संघ भारत दौरा करणार आहे. येत्या 22 जुलैपासून भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे.
![WI vs IND: एकदिवसीय मालिकेत रोहित, विराटसह वरीष्ठ खेळाडूंना विश्रांती; टी-20 मालिकेत खेळणार का? India Tour Of West Indies: Rohit, Virat & Bumrah RESTED from ODI series on West Indies Tour WI vs IND: एकदिवसीय मालिकेत रोहित, विराटसह वरीष्ठ खेळाडूंना विश्रांती; टी-20 मालिकेत खेळणार का?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/08/587ac05954c5897e0c9ecaa7b13138c51657278413_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India Tour Of West Indies: इंग्लंडविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळल्यानंतर भारतीय संघ भारत दौरा करणार आहे. येत्या 22 जुलैपासून भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारताचा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर, या मालिकेत भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), ऋषभ पंतला (Rishabh Pant) आणि जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) विश्रांती देण्यात आली आहे. यामुळं वेस्ट इंडीजविरुद्ध टी-20 मालिकेत हे सर्व खेळाडू खेळणार का? या संदर्भातील महत्वाची माहिती समोर आलीय.
दरम्यान, येत्या ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात आगामी टी-20 विश्वचषक खेळला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं वरीष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याचं ठरवलं आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली आणि पंत खेळणार नाहीत. पण टी-20 मालिकेत त्यांची संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध टी-20 मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसू शकतो. याशिवाय, प्रेक्षकांना विराट कोहली आणि ऋषभ पंतचीही फटकेबाजी आणि जसप्रीत बुमराहची भेदक गोलंदाजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नुकतीच बीसीसीआयनं वेस्ट इंडीजविरुद्ध भारताच्या एकदिवसीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेत कोणकोणत्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं? हे जाणून घेऊयात.
वेस्टइंडीजविरुद्ध भारताचा टी-20 संघ
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकिपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान , प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.
रोहित शर्माच्या नेतृत्वाकडं सर्वांचं लक्ष
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात वेस्ट इंडीजच्या संघानं भारत दौरा केला होता. या दौऱ्यात वेस्ट इंडीजनं भारताविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली होती. या मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघानं वेस्ट इंडीजला 3-0 नं पराभूत केलं होतं. या मालिकेतील बदला घेण्यासाठी वेस्ट इंडीजचा संघ मैदानात उतरेल. वेस्ट इंडीज दौऱ्यातील टी-20 मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ कशी कामगिरी करतो? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)