एक्स्प्लोर

India ODI World Cup Squad Live: विश्वचषकाच्या शिलेदारांची घोषणा, पाहा कुणाला मिळाली संधी ?

India ODI World Cup Squad 2023 : विश्वचषकासाठी आज भारताच्या 15 शिलेदारांची निवड होणार आहे.

Key Events
India Squad for ICC ODI World Cup 2023 live updates Rohit Sharma Virat Kohli jasprit bumrah KL rahul India ODI World Cup Squad Live: विश्वचषकाच्या शिलेदारांची घोषणा, पाहा कुणाला मिळाली संधी ?
India ODI World Cup Squad 2023

Background

India ODI World Cup Squad 2023 : विश्वचषकासाठी आज भारताच्या 15 शिलेदारांची निवड होणार आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड यांच्याशी चर्चा केल्यानंतर अंतिम 15 खेळाडूंची नावे निश्चित केली आहेत. आज दुपारी 1.30 वाजता पत्रकार परिषदेत घेऊन अजित आगरकर सघाची घोषणा करणार आहेत. अजित आगरकर श्रीलंकेतच आहेत. तेथून ते पत्रकार परिषद घेऊन संघाची घोषणा करणार आहे. 15 जणांमध्ये कुणाला संधी मिळणार? याकडे भारतीय क्रीडा प्रेमींचं लक्ष लागलेय. 

5 ऑक्टोबर रोजी विश्वचषकाचा पहिला सामना रंगणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी अखेरचा सामना रंगणार आहे. भारतीय संघ आपल्या विश्वचषकाच्या अभियानाला आठ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्याने होणार आहे. हा सामना चेन्नई येथे रंगणार आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड आज ( 5 सप्टेंबर ) रोजी होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील 15 जणांच्या संघात कुणाला संधी मिळणार... हे जवळपास निश्चित झालेय. विश्वचषकासाठी निवडल्या जाणाऱ्या संघामध्ये आशिया चषकात खेळत असलेल्या खेळाडूंचीच निवड होणार आहे. रोहित शर्माकडे संघाची धुरा असेल. त्याशिवाय विराट कोहली,  जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, ईशान किशन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादव यांची नावे निश्चित आहे. 

अजित आगरकर यांच्या नेतृत्वातील निवड समिती काही आश्चर्यकारक निर्णय घेऊ शकते. पण रिपोर्ट्सनुसार, आशिया चषकात खेळणाऱ्या संघातीलच खेळाडू निश्चित झाले आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, विश्वचषकासाठी संघ निवड करण्याची अखेरची तारीख पाच सप्टेंबर आहे. 27 सप्टेंबर पर्यंत संघात बदल केले जाऊ शकतात.  भारतासाठी जमेची बाजू म्हणजे, केएल राहुल फिट झालाय. एनसीएमधील मेडिकल टीमने केएल राहुल तंदुरुस्त झाल्याचे जाहीर केले आहे. 

केएल राहुल तंदुरुस्त - 
विकेटकीपर फलंदाज केएल राहुल याने फिटनेस चाचणी पास केली आहे. केएल राहुल आज, मंगळवारी श्रीलंकेत दाखल होणार असून भारतीय संघासोबत जोडला जाणार आहे. टीम इंडियाच्या सुपर 4 मधील सामन्यांसाठी राहुल उपलब्ध असेल. दुखापतीमुळे केएल राहुल आशिया चषखातील पहिल्या दोन सामन्याला उपलब्ध नव्हता. बेंगलोर येथे एनसीएमध्ये केएल राहुल याने फिटनेसवर काम केले. सोमवारी केएल राहुलने फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली. राहुल दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. विश्वचषकासाठी राहुल उपल्बध असेल. त्याची निवडही निश्चित मानली जात आहे. 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (रिजर्व विकेटीकपर), हार्दिक पांड्या (उपकप्तान), रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह. 

Rohit Sharma (Captain), Hardik Pandya (vice-captain), Shubman Gill, Virat Kohli, Shreyas Iyer, KL Rahul, Ravindra Jadeja, Shardul Thakur, Jasprit Bumrah, Mohammed Siraj, Kuldeep Yadav, Mohammed Shami, Axar Patel, Ishan Kishan, Suryakumar Yadav. 

5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या रनसंग्रामाला सुरुवात होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर विश्वचषकातील पहिला सामना रंगणार आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. 8 ऑक्टोबरपासून भारत आपल्या विश्वचषकाच्या अभियानाला सुरुवात करणार आहे.

14:28 PM (IST)  •  05 Sep 2023

फलंदाजीत डेफ्थ - रोहित

विश्वचषकासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट संघाची निवड केली आहे. भारताची फलंदाजी मजबूत झाली आहे. फलंदाजी डेफ्थ आहे. त्याशिवाय आमच्याकडे स्पिन आणि वेगवान गोलंदाजीचे पुरसे पर्याय आहेत, असे रोहित म्हणाला. 
 

14:26 PM (IST)  •  05 Sep 2023

हार्दिक पांड्या संपुर्ण पॅकेज, त्याचा फॉर्म विश्वचषकासाठी महत्वाचा - रोहित शर्मा

विश्वचषकासाठी आज भारतीय संघाची घोषणा झाली. रोहित शर्मा याच्याकडे कर्णधारपदाची तर हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत टीम इंडियाची घोषणा केली. यावेळी रोहित शर्माने हार्दिक पांड्याचे तोंडभरुन कौतुक केले. हार्दिक पांड्या पूर्णपणे पॅकेज आहे. विश्वचषकात त्याचा फॉर्म महत्वाचा ठरणार आहे, असे रोहित शर्मा म्हणाला. हार्दिक पांड्या गोलंदाजी आणि फलंदाजीत योगदान देतो. पाकिस्तानविरोधात हार्दिक पांड्याने मोक्याच्या क्षणी 87 धावांची खेळी केली होती. तर नेपाळविरोधात भेदक मारा केला. हार्दिक पांड्या फॉर्मात असणे भारतीय संघासाठी जमेची बाजू ठरु शकते, याची कल्पना कर्णधार रोहित शर्मा याला आहे. 

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Shashank Ketkar Slammed Mandar Devasthali: '5 लाख थकवलेत, पैसे मागितले की रडतो, गयावया करतो...'; मंदार देवस्थळींवर शशांक केतकरचे गंभीर आरोप, स्क्रिनशॉर्ट शेअर करुन मेसेजही दाखवले
'5 लाख थकवलेत, पैसे मागितले की रडतो, गयावया करतो...'; मंदार देवस्थळींवर शशांक केतकरचे गंभीर आरोप
Umar Khalid Bail Denied: 'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले

व्हिडीओ

Pune NCP Office : कार्यालय राष्ट्रवादीचं, राजकारण वादाचं; कार्यालय बांधणरी कल्पवृक्ष पार्थ पवारांची? Special Report
Chhatrapati Sambhajinagar Saree Shopping : स्वस्त साड्या पडल्या महागात, महिला पडेपर्यंत मोह आवरेना? Special Report
Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Shashank Ketkar Slammed Mandar Devasthali: '5 लाख थकवलेत, पैसे मागितले की रडतो, गयावया करतो...'; मंदार देवस्थळींवर शशांक केतकरचे गंभीर आरोप, स्क्रिनशॉर्ट शेअर करुन मेसेजही दाखवले
'5 लाख थकवलेत, पैसे मागितले की रडतो, गयावया करतो...'; मंदार देवस्थळींवर शशांक केतकरचे गंभीर आरोप
Umar Khalid Bail Denied: 'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, संतोष धुरी यांचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरींचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, भाजप प्रवेश ठरला
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Embed widget