Ind vs Aus ODI : BCCI ने टीम इंडियाची केली घोषणा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी 'या' खेळाडूंना दिली संधी, स्टार खेळाडू बाहेर
भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये उभय संघांमधील 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे.
Team India announced for ODI series against Australia : भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये उभय संघांमधील 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या महिला निवड समितीने 16 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. संघाची कमान हरमनप्रीत कौरच्या हाती असेल तर स्मृती मानधना उपकर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. यास्तिका भाटिया आणि रिचा घोष या दोन यष्टीरक्षकांचा संघात समावेश करण्यात आला आहे.
निवड समितीने पुन्हा एकदा 20 वर्षीय स्टार फलंदाज शेफाली वर्माला संधी दिली नाही. तिचा अलीकडचा एकदिवसीय फॉर्म खराब राहिला आहे. शेफालीने यावर्षी 6 सामन्यात केवळ 108 धावा केल्या असून त्यापैकी 33 धावा ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या वनडे मालिकेत खराब कामगिरीमुळे तिला संघातून वगळण्यात आले होते.
5 डिसेंबरपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. यानंतर दुसरा सामना 8 डिसेंबरला तर मालिकेतील शेवटचा सामना 11 डिसेंबरला होणार आहे. पहिले दोन एकदिवसीय सामने ब्रिस्बेनमधील ॲलन बॉर्डर फील्डवर खेळवले जातील, त्यानंतर मालिकेतील अंतिम सामना पर्थमधील WACA मैदानावर खेळवला जाईल, जो ICC महिला चॅम्पियनशिपचा भाग आहे. अलीकडेच टीम इंडियाने न्यूझीलंडला मायदेशात वनडे मालिकेत 2-1 ने पराभूत केले होते आणि आता ऑस्ट्रेलियाला त्याच्याच घरच्या मैदानावर पराभूत करण्याकडे लक्ष असेल. मात्र, टीम इंडियासाठी हे इतकं सोपं नसेल.
🚨 NEWS 🚨
— BCCI Women (@BCCIWomen) November 19, 2024
Team India (Senior Women) squad for Tour of Australia announced.
Details 🔽 #TeamIndia | #AUSvINDhttps://t.co/lzhKMmcWr4
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला एकदिवसीय सामना : 5 डिसेंबर, ब्रिस्बेन (9.50 AM)
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा एकदिवसीय सामना : 8 डिसेंबर, ब्रिस्बेन (5:50 AM)
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तिसरा एकदिवसीय सामना – 11 डिसेंबर, पर्थ (भारतीय वेळेनुसार सकाळी 9.50)
तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रिया पुनिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), तेजल हसबनीस, दीप्ती. शर्मा, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, राधा यादव, तीतस साधू, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, सायमा ठाकूर.