Ind vs Eng Test : 'ड्युक बॉल’वरून वाद चिघळला, भारतीय संघाचा संताप अनावर; थेट ICCकडे केली तक्रार, नक्की काय झालं मैदानावर?
ENG vs IND 2025 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 'ड्युक' बॉलवरून मोठा वाद झाला होता.

Team India taken dukes ball matter to ICC : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 'ड्युक' बॉलवरून मोठा वाद झाला होता. विशेषतः लॉर्ड्स कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी बॉल चेंज प्रकरणामुळे हा वाद चव्हाट्यावर आला. या दिवशी पहिल्याच सत्रात दोन वेळा चेंडू बदलण्यात आला, मात्र दुसऱ्यांदा जेव्हा चेंडू बदलण्यात आला, तेव्हा भारतीय कर्णधार शुभमन गिल अंपायर्ससोबत वाद घालताना दिसला. त्यावेळी गिलसह अनेक भारतीय खेळाडू चेंडूच्या गुणवत्तेवर नाराजी व्यक्त करत होते.
टीम इंडियाची ICCकडे तक्रार – काय आहे प्रकार?
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, तिसऱ्या दिवशी जेव्हा दुसऱ्यांदा चेंडू बदलण्यात आला, तेव्हा भारताला जो रिप्लेसमेंट बॉल देण्यात आला तो 10 ओव्हर्स नाही, तर तब्बल 30-35 ओव्हर्स जुन्या खेळलेला होता. नियमांनुसार, जेव्हा चेंडू बदलला जातो, तेव्हा तो मूळ चेंडूइतकाच जुन्या टप्प्यावर असावा, म्हणजे सामना तितक्याच टप्प्यावर सुरू राहतो. मात्र, लॉर्ड्सच्या मैदानावर अंपायर्सकडे 10 ओव्हर्स वापरलेला चेंडूच उपलब्ध नव्हता.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "लॉर्ड्सच्या सामन्यात ड्युक चेंडूने 10 ओव्हर्सनंतरच खराब झाला. अंपायर्स ज्या रिंग्ज वापरून चेंडू गोल आहे की नाही हे तपासतात, त्यातून चेंडू जात नव्हता. त्यामुळे अंपायर्सनी चेंडू बदलण्याचा निर्णय घेतला. मात्र, रिप्लेसमेंट बॉल 30 ते 35 ओव्हर्स जुन्या टप्प्यावरचा होता."
Ball controversy at Lord’s!
— Sporttify (@sporttify) July 31, 2025
Team India Management raised red flag say they were given a 30-35 over old Dukes ball to replace a 10-over-old one — losing swing & momentum.
🗣 “We’d have stuck with the deformed ball if we knew. Bumrah had 3 in 14 balls before the switch.”
👉 ICC… pic.twitter.com/OOXd2y9NL6
"जर आधी सांगितलं असतं, तर तोच चेंडू वापरला असता!"
त्या अधिकाऱ्याने असंतोष व्यक्त करत पुढे सांगितले, "जेव्हा चेंडू बदलण्याची वेळ येते, तेव्हा संघाला हे कळवले जात नाही की, आता जो बॉल मिळेल तो किती ओव्हर्स जुना असेल. लॉर्ड्समध्ये आम्हाला याची कल्पना दिलीच गेली नाही. जर आधीच सांगितलं असतं, तर आम्ही जुनाच चेंडू वापरला असता. आयसीसीने यामध्ये हस्तक्षेप करावा आणि हा नियम बदलावा." भारतीय संघाला या चुकीचा फटका बसल्याचेही बोलले जात आहे, कारण त्याच सामन्यात टीम इंडियाला 22 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
हे ही वाचा -





















