एक्स्प्लोर

16 वर्षापूर्वी भारतानं खेळला पहिला टी-20 सामना, त्या सामन्यातील सर्वच रिटायर, पण दिनेश कार्तिकनं सोडली नाही जिद्द

 Team India, Dinesh Karthik, IND vs SA T20 Series : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये 9 जून रोजी पाच सामन्याच्या टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे.

 Team India, Dinesh Karthik, IND vs SA T20 Series : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये 9 जून रोजी पाच सामन्याच्या टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. भारताने 16 वर्षापूर्वी एक डिसेंबर 2006 मध्ये पहिला टी 20 सामना खेलला होता. तेव्हापासून आतापर्यंत भारतीय संघाने 159 टी 20 सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे, पहिला टी 20 सामना खेळणारा कार्तिक आताही भारतीय संघाचा सदस्य आहे. इतर सर्व खेळाडू निवृत्त झाले आहेत.  

कार्तिक वगळता सर्व खेळाडू निवृत्त -
एक डिसेंबर 2006 रोजी भारताने दक्षिण आफ्रिकाविरोधात आपला पहिला आंतरराष्ट्रीय टी 20 सामना खेळला होता. तेव्हा वीरेंद्र सेहवाग भारताचा कर्णधार होता. त्यावेळी भारतीय संघात सचिन तेंदुलकर, दिनेश मोंगिया, महेंद्र सिंह धोनी, सुरेश रैना, इरफान पठान, हरभजन सिंह, झहीर खान, एस श्रीसंत, अजीत अगरकर आणि दिनेश कार्तिक खेळले होते. कार्तिक वगळता सर्व खेळाडू निवृत्त झाले आहेत.   

भारताच्या पहिल्या टी 20 सामन्यात कार्तिकची मॅच विनिंग खेळी 
16 वर्षापूर्वी भारताच्या पहिल्या टी 20 सामन्यात दिनेश कार्तिकने मॅच विनिंग खेळी केली होती. दक्षिण आफ्रिकाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 126 धावा केल्या होत्या. भारताकडून मोक्याच्या क्षणी दिनेश कार्तिकने 31 धावांची मॅचविनिंग खेळी केली होती.  या सामन्यात वीरेंद्र  सहवाग 34 आणि मोंगियाने 38 धावा केल्या होत्या. तर धोनी शून्य, सचिन 10 आणि रैना तीन धावांवर नाबाद होता.  

कार्तिकला संधी कमी - 
भारताला पहिला टी 20 सामना जिंकून देणाऱ्या कार्तिकला आतंरराष्ट्रीय टी 20 सामन्यात म्हणावी तशी संधी मिळाली नाही.  भारताने आतापर्यंत 150 पेक्षा जास्त टी 20 सामने खेळले आहेत. पण पहिल्या सामन्यात भारताला विजय मिळवून देणाऱ्या कार्तिकला फक्त 31 सामन्यात संधी मिळाली आहे. दिनेश कार्तिकने भारताकडून अखेरचा टी 20 सामना 2019 मध्ये खेळला होता.  

निदहास चषकात अखेरच्या चेंडूवर षटकार - 

बांग्लादेशविरोधात दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत भारताला निदाहास चषक जिंकून दिला होता. त्यानंतर कार्तिकला संधी मिळाली नाही. आश्चर्यकारक बाब म्हणजे, दिनेश कार्तिकला टी 20 सामन्यात अद्याप एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. टी 20 मध्ये कार्तिकच्या नावावर 399 धावा आहेत.  

आयपीएल 2022 मध्ये दमदार कामगिरी - 
भारतीय संघातून बाहेर असलेल्या कार्तिकने 2022 आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केले. आयपीएलमधील विस्फोटक फंलदाजीच्या जोरावर कार्तिकने पुन्हा एकदा भारतीय संघाचं दरवाजे उघडले आहेत. आयपीएल 2022 मध्ये कार्तिकने 184 च्या स्ट्राईक रेटने 330 धावांचा पाऊस पाडलाय. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
Sakri Vidhan Sabha Constituency : विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
Sharad Pawar : 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Priyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझाTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaUddhav Thackeray : बाळासाहेबांची रूद्राक्षाची माळ मी घराणेशाहीत घेतली - ठाकरेUddhav Thackeray : बाळासाहेबांचा जिव्हाळा असलेल्या शहरात झालेला गद्दाराचा विजय खटकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
Sakri Vidhan Sabha Constituency : विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
Sharad Pawar : 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
CM Yogi Adityanath : अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
Priyanka Gandhi : मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
×
Embed widget