Ind vs Ban Test LIVE : बांगलादेशविरुद्ध कसोटी खेळल्यानंतर ऋषभ पंतचा अपघात, 633 दिवसांनी पुन्हा खेळणार टेस्ट मॅच, कामगिरीकडे साऱ्यांच्या नजरा
ज्या क्षणाची सर्वजण वाट पाहत होते तो क्षण आला आहे. भारतीय संघ 43 दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.
India vs Bangladesh LIVE 1st Test Day 1 : ज्या क्षणाची सर्वजण वाट पाहत होते तो क्षण आला आहे. भारतीय संघ 43 दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. टीम इंडिया आजपासून म्हणजेच 19 सप्टेंबरपासून चेन्नईमध्ये पाहुण्या बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आहे, तर बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतो आहे.
बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांसह खेळणार आहे. भारतीय संघाचे मैदानात पुनरागमन होत असतानाच स्टार फलंदाजही प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. हा स्टार खेळाडू दुसरा कोणी नसून यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत आहे.
2 वर्षांनंतर पहिली कसोटी खेळण्यासाठी सज्ज
ऋषभ पंत दोन वर्षांनंतर पहिली कसोटी खेळण्यासाठी सज्ज आहे. बुधवारी नेट प्रॅक्टिसदरम्यान त्याने आपल्या जुन्या खेळाची झलकही दिली. डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी खेळल्यानंतर ऋषभ पंतचा एका भीषण कार अपघात झाला होता, ज्यामध्ये पंत गंभीर जखमी झाल्यानंतर क्रिकेटच्या मैदानावर परतणे हा मोठा पराक्रम आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पंतने शेवटचा कसोटी सामना 629 दिवसांपूर्वी खेळला होता. योगायोगाने त्याने 2022 साली बांगलादेशविरुद्ध शेवटची कसोटीही खेळली होती.
पंत आता एमए चिदंबरम स्टेडियमवर त्याच संघाविरुद्धच्या कसोटीत पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ध्रुव जुरेलने या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याच्या यष्टीरक्षण आणि फलंदाजीने प्रभावित केले होते, परंतु परतल्यावर पंतने स्पष्ट केले की रेड बॉल क्रिकेटमध्ये तो टीम इंडियाची पहिली पसंती आहे.
ऋषभ पंतने मर्यादित षटकांच्या फॉरमॅटसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही तो एक भाग होता, पण आता तो दीर्घ फॉर्मेटमध्ये पुनरागमन करत आहे.
भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
🚨 Here's our Playing XI 🔽
— BCCI (@BCCI) September 19, 2024
Follow The Match ▶️ https://t.co/jV4wK7BOKA #TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/0WoiP87k7p
बांगलादेश संघाची प्लेइंग इलेव्हन : शादमान इस्लाम, झाकीर हसन, नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा.
हे ही वाचा :
IPL Mega Auction Date : IPL मेगा लिलावाआधीच BCCIचा मोठा डाव; परदेशीत होणार ऑक्शन, तारीख आली समोर?