(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Independence Day 2022: स्वातंत्र्यानंतर भारतानं क्रीडा क्षेत्रात सोडली छाप, ऐतिहासिक प्रवासावर एक नजर
Independence Day 2022: भारतात येत्या 15 ऑगस्ट रोजी 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे.
Independence Day 2022: भारतात येत्या 15 ऑगस्ट रोजी 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्यानंतर भारतानं विविध क्षेत्रात प्रगती करत जगभरात आपली छाप सोडली आहे. भारताच्या प्रगतीत भारतीय खेळाडूंनी मोलाचा वाट उचलला आहे. दरम्यान,भारतानं क्रिकेट आणि हॉकीसह बऱ्याच खेळात प्रगती केलीय. भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यानिमित्त देशानं कशाप्रकारे क्रिडा क्षेत्रात आपला ठसा उमटवला? यावर एक नजर टाकुयात.
भारतीय हॉकी संघाचं पहिलं सुवर्णपदक
भारताला 15 ऑगस्ट 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळवलं. मात्र, स्वातंत्र्य मिळण्याच्या दोन वर्षापूर्वी भारतीय हॉकी संघानं देशासाठी सुवर्णपदक जिंकलं होतं. लंडन येथे खेळण्यात आलेल्या किशन लालच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघानं ग्रेट ब्रिटेनला 4-0 नं नमवलं होतं. या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यानंतर 1952 मध्ये भारतीय हॉकी संघानं अंतिम सामन्यात हॉलंडला पराभव केला. या विजयासह भारतानं दुसऱ्यांदा हॉकीमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं.
1983 मध्ये भारतानं विश्वचषक जिंकला
भारताचा माजी कर्णधार कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघानं पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरलं होतं. 1983 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतासमोर बलाढ्य वेस्ट इंडीजचं आव्हान होतं. मात्र, कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आणि विश्वचषक जिंकण्याचा निर्धार केलेल्या भारतीय संघानं वेस्ट इंडीजचा 37 धावांनी पराभव करत विश्वचषकावर नाव कोरलं.
फॉर्मूल वन रेस
2005 मध्ये फॉर्मूल वन रेसमध्ये सहभाग घेणारा नारायण कार्तिकेयन पहिला भारतीय ठरला होता. कार्तिकेयननं 2011 मध्ये भारतातील बुद्धा इंटरनॅशनल सर्किट येथे झालेल्या पहिल्या शर्यतीतही भाग घेतला आहे. असं करणारा तो एकमेव भारतीय होता.
1958 मध्ये मिल्खा सिंहनं कॉमनवेल्थ स्पर्धत भारतासाठी सुवर्णपदक जिंकलं
फ्लाईंग सिंह म्हणून प्रसिद्ध असलेल्या भारताचा धावपटू मिल्खा सिंहनं 1958 च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं. या स्पर्धेत मिल्खा सिंहनं दमदार प्रदर्शन करत जगभरात आपला ठसा उमटवला. नुकतीच बर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतानं एकूण 61 पदकं जिंकली. ज्यात 22 सुवर्णपदक, 16 रौप्यपदक आणि 23 कांस्यपदक जिंकलंय. या स्पर्धेत वेटलिफ्टिंग आणि बॉक्सिंगमध्ये भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी करून दाखवली आहे.
हे देखील वाचा-
- US Open 2022: नोवाक जोकोविच यूएस ओपनमधून बाहेर, कोरोना लशीला विरोध करणं पडलं महागात!
- Ballon d'Or : 17 वर्षात प्रथमच प्रतिष्ठीत 'बलॉन डी'ओर पुरस्काराच्या शर्यतीत मेस्सी नाही..., रोनाल्डोसह 30 जणांना नॉमिनेशन
- Shoaib Akhtar: वाढदिवसाच्या दिवशीच शोएब अख्तरनं सांगितली वाईट बातमी, म्हणतोय 'पाच वर्षांनंतर माझं...'