एक्स्प्लोर

Womens Asia Cup 2022 Final: श्रीलंकेचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन

Womens Asia Cup 2022 Final: भारत आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघात (Sri Lanka Women vs India Womens) आज महिला आशिया चषकातील अंतिम सामना खेळला जातोय.

Womens Asia Cup 2022 Final: भारत आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघात (Sri Lanka Women vs India Womens) आज महिला आशिया चषकातील अंतिम सामना खेळला जाईल.  सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Sylhet International Cricket Stadium) रंगणाऱ्या या महत्वाच्या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या स्पर्धेत भारतीय महिला संघाची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिलीय. या हंगामात भारतीय महिलांनी फक्त एक सामना वगळता सर्व सामने जिंकले आहेत. पहिल्या गट सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला. आता अंतिम सामना जिंकून विजेतेपदावर कब्जा करण्याच्या इराद्यानं संघ मैदानात उतरणार आहे.

स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्जकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा
या सामन्यात स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्याकडून विशेष आशा असतील. जेमिमा या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. तिनं पाच डावात 215 धावा केल्या आहेत. तर, या स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत शेफाली वर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिनं पाच डावात 161 धावा केल्या आहेत. स्मृती सलामीवीर म्हणून मैदानात उतरणार आहे. त्यामुळं तिच्याकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा करू शकतो.

दिप्ती शर्माची भेदक गोलंदाजी
दीप्ती शर्मानं या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. तिनं आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यात 13 विकेट्स घेतले आहेत. या सामन्यातही भारताला तिच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. राजेश्वर गायकवाडनंही चांगली गोलंदाजी केली आहे. तिनं सहा सामन्यात सात विकेट घेतल्या आहेत.

भारतीय महिलांचा आशिया षटकातील प्रवास
महिला टी20 आशिया कप 2022 मधील भारतीय संघाची कामगिरी पाहिली तर ती सर्वोत्तम होती. पहिल्या सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला होता. दुसऱ्या सामन्यात मलेशियाचा 30 धावांनी नमवलं. यानंतर यूएईवर मोठा विजय नोंदवत त्यांचा 104 धावांनी पराभव केला. मात्र, भारतीय संघाला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर बांगलादेश आणि थायलंडचा पराभव करत भारतानं स्पर्धेत जोरदार पुनरागमन केलं. पहिल्या उपांत्य फेरीत भारतानं थायलंडचा 74 धावांनी पराभव करत फायनलमध्ये धडक दिली.

भारतीय महिला प्लेइंग इलेव्हन:
शेफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, दयालन हेमलता, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकिपर), पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, रेणुका सिंह, राजेश्वरी गायकवाड.

श्रीलंका महिला प्लेइंग इलेव्हन:
चमारी अट्टापट्टू (कर्णधार), अनुष्का संजीवनी (विकेटकिपर), हर्षिता मडावी, हसिनी परेरा, निलाक्षी डी सिल्वा, कविशा दिलहरी, मलशा शेहानी, ओशादी रणसिंघे, सुगंधिका कुमारी, इनोका रणवीरा, अचिनी कुलसूरिया.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gautam Gambhir : रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर?  गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर? गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
Mutual Fund : 2025 मध्ये गुंतवणुकीतून दमदार रिटर्न्स मिळवायचेत, 'या' म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक ठरेल फायदेशीर, यादी एका क्लिकवर  
2025 मध्ये दमदार रिटर्न्ससाठी 15 म्युच्यूअल फंड्सवर लक्ष ठेवा, तज्ज्ञांनी नेमकं काय म्हटलं?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Fadnavis inaugurates bridge : बांधून दाखवलाच, गडचिरोलीतल्या पुलाची कहाणीSpecial Report What is Generation Beta : GI TO AI तुमची ओळख काय? तुमची जनरेशन काय?Amitesh Kumar on Pune Crime|पुण्यात गुन्हेगारी, नववर्षाच्या सुरुवातीलाच खून, पोलीस आयुक्त म्हणाले...Zero Hour Full | मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज, उद्या फडणवीसांची भेट घेणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gautam Gambhir : रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर?  गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर? गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
Mutual Fund : 2025 मध्ये गुंतवणुकीतून दमदार रिटर्न्स मिळवायचेत, 'या' म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक ठरेल फायदेशीर, यादी एका क्लिकवर  
2025 मध्ये दमदार रिटर्न्ससाठी 15 म्युच्यूअल फंड्सवर लक्ष ठेवा, तज्ज्ञांनी नेमकं काय म्हटलं?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
धक्कादायक! ZP शाळेचा छत कोसळला, तीन विद्यार्थी जखमी; गावकरी शाळेला कुलूप ठोकणार
धक्कादायक! ZP शाळेचा छत कोसळला, तीन विद्यार्थी जखमी; गावकरी शाळेला कुलूप ठोकणार
बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना उचललं, मोबाईल तपासले
बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना उचललं, मोबाईल तपासले
IPO : 2024 मधील शेवटचा आयपीओ तब्बल 227 पट सबस्क्राइब, इंडो फार्मसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, GMP किती रुपयांवर ?
इंडो फार्मच्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, 227 पट सबस्क्राइब, जीएमपी कितीवर?
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
Embed widget