IND vs PAK: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकमेकांना भेटल्यावर काय बोलतात? सर्वांसमोर रोहित-बाबरनं सांगितली अंदर की बात!
T20 World Cup 2022: भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत पाहण्यासाठी दोन्ही देशांतील प्रेक्षकांमध्ये प्रचंड उस्तुकता पाहायला मिळते.
T20 World Cup 2022: भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना क्रिकेटविश्वातील सर्वात मोठ्या सामन्यांपैकी एक आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत पाहण्यासाठी दोन्ही देशांतील प्रेक्षकांमध्ये प्रचंड उस्तुकता पाहायला मिळते. ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकात दोन्ही संघ त्यांचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी एकमेकांशी खेळतील. यापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनं (Babar Azam) दोन्ही देशातील खेळाडू जेव्हा ऐकमेंकाना भेटतात, तेव्हा त्यांच्यात नेमकं काय बोलणं होतं? यामागचं गुपीत सांगितलंय.
दरम्यान, येत्या 16 ऑक्टोबरपासून आगामी टी-20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.यापूर्वी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व 16 संघ आमने सामने आहे. यावेळी रोहित शर्मा आणि बाबर आझम यांनी अनेक प्रश्नांना उत्तर दिली. त्यावेळी दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांना भेटतात, तेव्हा त्यांच्यात काय चर्चा होते? असाही प्रश्न रोहित-बाबरला विचारण्यात आला.
रोहित-बाबर काय म्हणाले?
सर्वप्रथम बाबर म्हणाला की, "रोहित शर्मा माझ्यापेक्षा मोठा आहे आणि मी त्याच्याकडून जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करतोय. कारण त्याला खूप सामने खेळण्याचा अनुभव आहेत. आपण जितके अधिक शिकू तितके ते आपल्यासाठी चांगले आहे". यानंतर रोहित म्हणाला की, "जेव्हाही आम्ही भेटतो तेव्हा कोणतेही दडपण नसतं. आम्ही आशिया कपमध्ये भेटलो, आता भेटलो आणि जेव्हाही भेटतो तेव्हा घरची परिस्थिती कशी आहे? यावरच चर्चा होते. कुटुंब कसे आहे? फक्त यांच गोष्टी बोलल्या जातात. तसेच आमच्या आधीच्या पिढीत खेळलेल्या खेळाडूंनीही आम्हाला हेच सांगितलंय. आयुष्य कसं आहे? तुम्ही कोणती नवीन कार घेतली किंवा खरेदी करणार आहे?, हेच सर्वकाही बोललं जातं."
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, आर.अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, मोहम्मद शामी.
टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ:
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि शान मसूद.
हे देखील वाचा-